scorecardresearch

Premium

इंग्रजी गाणे वाजवल्याने मनसे पदाधिकारी संतापले; “मराठी गाणे वाजवले नाही तर…”

नामांकित खासगी रेस्टॉरंटमध्ये मराठी गाणे न लावण्यावरून अकोला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आक्रमक भूमिका घेतली.

Akola MNS takes an aggressive stance
शहरातील गोरक्षण मार्गावरील ‘केएफसी’ व ‘पिझ्झा हट’ येथे मराठी गाणी वाजवल्या जात नाहीत.(फोटो- लोकसत्ता टीम)

लोकसत्ता टीम

अकोला : नामांकित खासगी रेस्टॉरंटमध्ये मराठी गाणे न लावण्यावरून अकोला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आक्रमक भूमिका घेतली. व्यवस्थापनाला जाब विचारून आगामी काळात मराठी गाणे न वाजवल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला.

migrant hawkers on kalyan railway skywalk beaten up by mns workers
मराठी लोकांबद्दल टिप्पणी, कल्याणमध्ये परप्रांतीय फेरीवाल्यांना मनसैनिकांचा चोप
Shivlal Jadhav
राजकारणातही ‘काका मला वाचवा’ असा आवाज…
Raj Thackeray Uddhav Thackeray
“…तेव्हा उबाठा गटाचे सैनिक बच्चे होते”, मराठी पाट्यांच्या मुद्यावरून मनसेचा टोला
Raj Thackeray MNS Chief 9 1200x675
“तुम्ही रझाकारांना धडा शिकवलात, आता तुमच्यावर…”; दोघांचा उल्लेख करत राज ठाकरेंचा हल्लाबोल, म्हणाले…

शहरातील गोरक्षण मार्गावरील ‘केएफसी’ व ‘पिझ्झा हट’ येथे मराठी गाणी वाजवल्या जात नाहीत. त्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी जाब विचारला. त्यावर हे इंग्रजी गाणे वैयक्तिक नभोवाणीवरून वाजवले जातात, असे उत्तर स्थानिक कर्मचाऱ्यांनी दिले. त्यावर मनसे पदाधिकाऱ्यांचे समाधान न झाल्याने त्यांनी व्यवस्थापकाशी दुरध्वनीवरून संपर्क साधला. त्यावर वरिष्ठ व्यवस्थापनाने काही दिवसांचा वेळ मागितला व त्यांना ‘ईमेल’द्वारे कळवण्यात आले.

आणखी वाचा-शिंदे गटासाठी यवतमाळ-वाशीम लोकसभा मतदार संघ अडचणीचा ठरणार! भाजपसंबंधित खासगी संस्थेच्या सर्वेक्षणातील निष्कर्ष

मराठी गाणे वाजणार नाही तोपर्यंत सुरू असलेले इतर गाणे बंद करावे, अशी आग्रही भूमिका मनसेने घेतली. त्यानंतर दोन दिवसापासून संबंधित रेस्टॉरंटमध्ये गाणे बंद आहे. लवकरात लवकर मराठी गाणी न वाजवल्यास मनसे आक्रमक आंदोलन करणार असल्याचा इशारा व्यवस्थापकला देण्यात आला. यावेळी जिल्हाध्यक्ष पंकज साबळे, शहर संघटक अरविंद शुक्ला, जिल्हा सहसचिव मोहन मते, शहर उपाध्यक्ष सोनू अवचार व आकाश शेजे उपस्थित होते.

Latest Comment
View All Comments
Post Comment

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Akola mns takes an aggressive stance on not playing marathi songs in famous private restaurants ppd 88 mrj

First published on: 02-10-2023 at 14:13 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×