अकोला : अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांचे साडेतीन हजारावर शिष्यवृत्तीचे अर्ज महाविद्यालय स्तरावर प्रलंबित आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती धोक्यात येऊ शकते. कोणीही पात्र विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित राहू नये, यासाठी समाजकल्याण विभागाने महाविद्यालयांना तंबी दिली.

अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती, मॅट्रिकोत्तर शिक्षण शुल्क, परीक्षा शुल्क, राजर्षी छत्रपती शाहू महाराज गुणवत्ता शिष्यवृत्ती, व्यावसायिक पाठ्यक्रमांशी संलग्न असलेल्या वसतिगृहातील विद्यार्थ्यांना विद्यावेतन आणि व्यवसाय प्रशिक्षण शुल्क प्रतिपूर्ती योजना राबविण्यात येतात. चालू शैक्षणिक वर्षाचे महाडीबीटी पोर्टल ऑनलाईन अर्ज स्वीकृती करण्यासाठी २५ जुलै २०२४ पासून सुरू झाले. गेल्या सहा महिन्यांचा कालावधी लक्षात घेता मागील वर्षाच्या तुलनेत विद्यार्थ्यांचे अर्ज कमी प्रमाणात भरले गेले आहेत. तसेच ज्या विद्यार्थ्यांनी अर्ज भरले आहेत, त्यापैकी बरेच अर्ज अद्यापही महाविद्यालयस्तरावर पडताळणीसाठी प्रलंबित असल्याचे निदर्शनास आले. चालू आर्थिक वर्ष संपुष्टात येण्यास ७४ दिवसांपेक्षा कमी कालावधी शिल्लक आहे. मागील वर्ष २०२३-२४ मध्ये अनुसूचित जाती प्रवर्गाचे एकूण १५ हजार ४७५ अर्ज नोंदणीकृत झाले होते. मागील वर्षाच्या तुलनेत अकोला जिल्ह्यातील विविध महाविद्यालयातील सर्व योजनांचे सुमारे १० हजार ७४५ विद्यार्थ्यांचे अर्ज नोंदणीकृत झाले असल्याचे दिसते. या अर्जांपैकी विद्यार्थी स्तरावर ५११ व महाविद्यालय स्तरावर तीन हजार ४९६ अर्ज प्रलंबित आहेत.

Criteria to Study Abroad for Indian Students
जावे दिगंतरा : परदेशातील शिक्षणासाठी मी तयार आहे का?
मुख्यमंत्रीपद नाही आणि महत्त्वाचं गृहखातंही नाही यामुळे शिंदेंच्या नाराजीत भरच पडली. (फोटो सौजन्य पीटीआय)
Maharashtra Politics : नाराज एकनाथ शिंदे भाजपासाठी अडचणीचे?
Relief for teacher recruitment candidates Proposal submitted for TET exam
शिक्षक भरती उमेदवारांना दिलासा… ‘टेट’ परीक्षेसाठी प्रस्ताव सादर…
ews certificate
ईडब्ल्यूएस विद्यार्थांना राज्याच्या नमुन्यातच प्रमाणपत्र द्यावे लागणार
The application deadline for 25 percent reserved seats in private schools under rte has been extended
‘आरटीई’अंतर्गत प्रवेश अर्जांसाठी मुदतवाढ, आतापर्यंत किती अर्ज दाखल?
Information from Minister Atul Save regarding the distribution of scholarships by the Social Welfare Department Pune news
समाजकल्याण विभागाच्या शिष्यवृत्तींचे लवकरच वितरण; मंत्री अतुल सावे यांची माहिती
traffic solutions at Pune University after traffic solutions issue clear
विद्यापीठासमोरील कोंडी फुटणार; भूसंपादनाचा प्रश्न अखेर मार्गी
Idol Distance Education, Mumbai , Students ,
मुंबई : दूरस्थ शिक्षणापासून विद्यार्थी दूर, यंदा १६ अभ्यासक्रमांसाठी अवघे २४ हजार ८९४ विद्यार्थी

हेही वाचा – ‘ग्लोबल वॉर्मिंग’विरोधात शंखनाद, चंद्रपुरात पर्यावरण बदलावर…

‘या’ १० महाविद्यालयात सर्वाधिक प्रलंबित अर्ज

सर्वाधिक अर्ज प्रलंबित असलेल्या पहिल्या दहा महाविद्यालयांची यादी जाहीर केली. त्यानुसार पातूर येथील डॉ. एच.एन. सिन्हा महाविद्यालयात १६५, अकोल्यातील श्री शिवाजी कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात १५५, श्री शिवाजी अभियांत्रिकी महाविद्यालयात १०४, राधादेवी गोयनका महाविद्यालयात ६३, सीताबाई कला महाविद्यालयात ६३, गाडेगाव येथील डॉ. गोपाळराव खेडकर वरिष्ठ महाविद्यालयात ११८, पातूर येथील तुळसाबाई कावळ महाविद्यालयात ९६, बाळापूर येथील धनाबाई महाविद्यालयात ६८, उगवा येथील नालंदा खासगी आयटीआयमध्ये ६३ आणि मूर्तिजापूर येथील ज्ञानपीठ येथे ५९ अर्ज प्रलंबित आहेत.

हेही वाचा – “…तर चंद्रपूर वीज केंद्रातील दोन संच बंद करू,” मुनगंटीवार यांचा इशारा

विद्यार्थ्यांनी शासनाच्या संकेतस्थळावर तत्काळ ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया करावी. पात्र प्रवर्गाचे विद्यार्थी अर्ज भरण्यापासून वंचित राहणार नाही, याची दक्षता संबंधित प्राचार्य यांनी घ्यावी. नोंदणीकृत सर्व प्रलंबित अर्जाची नियमानुसार पडताळणी करुन अंतिम मंजुरीस्तव पाठवल्यावर विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती प्रदान करण्याची प्रक्रिया राज्यस्तरावरून होईल. – डॉ.अनिता राठोड, सहाय्यक आयुक्त, समाजकल्याण विभाग.

Story img Loader