अकोला : गेल्या दोन दिवसांपासून पावसाची संततधार सुरूच आहे. सर्वत्र जलमय परिसर झाला. अकोला जिल्ह्यात गेल्या २४ तासांत मूर्तिजापूर तालुका वगळता इतर सर्व ठिकाणी सरासरी अतिवृष्टीची नोंद झाली. वाशीम जिल्ह्यातही मुसळधार पाऊस कोसळत असून अतिवृष्टीमुळे नदी-नाल्यांना पूर आला आहे. काही भागातील रस्ते वाहून गेले. पुलावरून पाणी वाहन असल्याने विविध मार्ग देखील ठप्प झाले आहेत.

दोन दिवसांत दमदार पाऊस

अकोला जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून दमदार पाऊस झाला. या पावसामुळे नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली. शहरातील सखल भागात पाणी साचले. विविध भागात नाल्याचे पाणी रस्त्यावर आले. काही भागात घरांमध्ये देखील पाणी शिरले आहे. त्यामुळे नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागला. पावसाच्या पाण्यामुळे रस्ते जलयम झाले असून वाहतूक प्रभावित झाली आहे.

खरीप हंगामातील पिकांसाठी पोषक

खरीप हंगामातील पिकांसाठी सर्वत्र पडणारा संततधार पाऊस पोषक ठरत आहे. अकोला जिल्ह्यात पावसाची मोठी तूट निर्माण झाली होती. मात्र, गेल्या दोन ते तीन दिवसांत झालेल्या पावसामुळे ही तूट भरून निघत आहे. जिल्ह्यात गेल्या २४ तासांमध्ये ७४.६ मि.मी. पावसाची नोंद झाली. सर्वाधिक १०२.३ मि.मी. पाऊस पातूर तालुक्यात झाला, तर सर्वात कमी मूर्तिजापूर तालुक्यात ६१.३ मि.मी. पाऊस पडला. अकोला ६७.८, अकोट ७२.३, तेल्हारा ७२.२, बाळापूर ८३.४ व बार्शीटाकळी तालुक्यात ७८.३ मि.मी. पाऊस पडला. या पावसामुळे सिंचन प्रकल्पातील जलसाठ्यात वाढ झाली. नदी-नाल्या दुथडी भरून वाहत आहेत.

वाशीम जिल्ह्यात मुसळधार पाऊस

वाशीम जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांमध्ये मुसळधार पाऊस पडला. जिल्ह्यात गेल्या २४ तासांमध्ये सरासरी ११०.९ मि.मी. पावसाची नोंद झाली. मालेगाव तालुक्यात सर्वाधिक १६१.५ मि.मी. पाऊस झाला, तर जिल्ह्यात सर्वात कमी ७६.३ मि.मी. पाऊस मालेगाव तालुक्यात पडला. वाशीममध्ये १२१.१, रिसोड ९६.४, मंगरुळपीर ८६.६ व मानोरा तालुक्यात ११६.३ मि.मी. पाऊस कोसळला.

पुलावरून पाणी, रस्ते वाहून गेल्याने वाहतूक ठप्प

पावसाच्या पाण्यामुळे वाशीम जिल्ह्यात अनेक भागातील रस्ते वाहून गेले आहेत. वैनगंगा नदीचे पाणी कोकलगाव ते सुरजखेडा पुलावरून वाहत असल्याने वाहतूक बंद आहे. बोरव्हा ते रोहणा मार्गावर नाल्यावरील पूल वाहून गेला. जायखेड जाणारा मार्ग, पारडीवरून आसेगाव मार्ग, खडकी ढंगारे ते रिठद, गोभणी ते करडा आदी मार्ग पाण्यामुळे