लोकसत्ता टीम

अकोला: प्लास्टिकच्या भस्मासुरामुळे शहरातील पर्यावरण धोक्यात आले आहे. एकदा वापर करता येणाऱ्या प्लास्टिक पिशव्यांमुळे पाणी, वायू आणि भूप्रदूषण होते. प्लास्टिकच्या पिशव्यांवर बंदी असतानाही दररोज एक लाख ८० हजार पिशव्या अकोल्याचे पर्यावरण प्रदूषित करीत असल्याचे धक्कादायक वास्तव ‘निसर्गकट्टा’ संस्थेच्या सर्वेक्षणात समोर आले आहे.

stealing liquor, liquor Kalyan,
कल्याण : महागड्या मद्याच्या बाटल्यांवर चोरट्यांचा डल्ला, माल चोरून ढाब्यांना विक्री
Balaji temple plot, CIDCO,
बालाजी मंदिर भूखंडाविरोधात याचिका, २५ एप्रिलला सुनावणी; सिडकोचा हरकतीचा मुद्दा फेटाळल्याचा दावा
Indiscriminate firing in nagpur by criminal over money of MD
नागपुरात एमडीच्या पैशावरून गुन्हेगाराचा अंधाधुंद गोळीबार, कुख्यात टोळ्या पुन्हा…
will Andheri Subway under water this year too work of widening of Mogra drain will be done next year
‘अंधेरी सबवे’ यंदाही पाण्याखाली? मोगरा नाल्याच्या रुंदीकरणाचे काम पुढच्या वर्षीच

निसर्गकट्टा संस्थेच्या माध्यमातून पर्यावरणाच्या विविध समस्यांचा अभ्यास करून त्या कमी करण्याचा प्रयत्न केला जातो. संस्थेच्यावतीने पर्यावरण दिनाच्या पार्श्वभूमीवर प्लास्टिक पिशव्यांसंदर्भात सर्वेक्षण केल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष अमोल सावंत यांनी दिली. अकोला शहराची ओळख प्लास्टिक पिशव्यांच्या कचऱ्यांचे शहर म्हणून होत आहे. त्यामुळे पाणी, वायू आणि जमिनीचे मोठ्या प्रमाणात प्रदूषण होत आहे.

हेही वाचा… गडचिरोली : ‘मोस्ट वॉन्टेड’ नक्षलवादी नेता कटकम सुदर्शनचा मृत्यू

महापालिकेच्या बाजारवसुली विभागातील आकडेवारीनुसार, शहरात भाजीविक्रेते, फुले हार व बुके, हात गाडीवर फळ व भाजी विक्रेता, खाद्यपदार्थ विक्रेता यांची संख्या सुमारे १८०० आहे. दररोज एक विक्रेता प्लास्टिकच्या १०० पिशव्यांचे एक पाकीट घेतो. प्रतिविक्रेत्याकडून दररोज प्लास्टिकच्या पिशव्या ग्राहकांना दिल्या जातात. विक्रेत्यांकडील १०० टक्के प्लास्टिकच्या पिशव्यांचा वापर झाल्यावर एक लाख ८० हजार प्लास्टिकच्या पिशव्या दररोज अकोल्याचे पर्यावरण प्रदूषित करतात. किरकोळ विक्रेत्यांसह दुकानदार देखील प्लास्टिक पिशव्या ग्राहकांना देतात.

हेही वाचा… चंद्रपूर : केंद्र सरकारची स्तुती करताना बेरोजगारी, काळेधन व महागाईवर मात्र माजी मंत्री अहीरांचे मौन!

‘निसर्गकट्ट्या’च्या सदस्यांनी विक्रेत्यांशी चर्चा करून त्यांना ‘तुम्ही बंदी असलेल्या प्लास्टिकच्या पिशव्या ग्राहकांना देता तर तुमच्यावर कारवाई होऊ शकते’ याची कल्पना दिली. विक्रेत्यांनी हे गमतीत घेऊन कारवाई करणार कोण? असा सवाल केला. त्यावरून विक्रेत्यांना कारवाईचा धाक राहिलाचा नसल्याचे स्पष्ट होते. साहित्य घरी आणल्यावर प्लास्टिक पिशव्या बाहेर फेकल्या जातात, त्या नालीमध्ये जाऊन नाली थुंबवतात. त्यामुळे डासाचा प्रादर्भाव वाढून विविध रोग पसरतात. इतर कचऱ्यासोबत सकाळच्या वेळेला प्लास्टिक पिशव्या जाळल्या जातात. त्यामधून निघणाऱ्या विषारी वायुमुळे श्वसनसंस्थ निकामी होणे व दम्यासारखे रोग होण्याची शक्यता वाढते.

हेही वाचा… नागपूर : डागा रुग्णालयात वीज खंडित; उपचार थांबले!, रुग्णांचा जीव टांगणीला

त्या पिशव्यांमधील अन्न खातांना प्लास्टिक पोटात जाऊन अनेक गायींचा मृत्यू झाला आहे. प्लास्टिक पिशव्यांमुळे कचरा कुजायला अडथळा निर्माण होतो व वातावरणात दुर्गंधी पसरते. याशिवाय ही इतर दुष्परिणाम प्लास्टिक पिशव्यांचे आहेत. पातळ एकदा वापरल्या जाणाऱ्या प्लास्टिक पिशव्यांवर कायद्याने बंदी आहे. त्याचा वापर करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाईची तरतूद आहे. मात्र, दुर्दैवाने कायद्याची कठोरपणे अंमलबजाणवी होत नाही. त्यामुळे सर्रासपणे प्लास्टिक पिशव्यांचा वापर होत असून पर्यावरणाची हानी होत आहे, असे सावंत म्हणाले.

सणासुदीच्या काळात पाच लाख पिशव्या

सणासुदीच्या दिवसात विक्रेत्यांची संख्या अडीच हजारांच्या घरात जाते. प्रत्येक जण प्लास्टिकच्या पिशव्यांचे दोन पाकीट संपवत असल्याने पाच लाख पिशव्या शहर प्रदूषित करतात.

पर्यावरणासाठी प्रत्येक नागरिकांनी बाजारात जाताना कापडी पिशवी घेऊन गेले तर प्लास्टिक पिशव्यांची समस्या कमी होऊ शकते. यासाठी महापालिकेने जनजागृती सोबत कायद्याचा धाक देणे गरजेचे आहे. – अमोल सावंत, निसर्गकट्टा, अकोला.