राज्यपाल भगतसिंग कोश्यारी, भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी, केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे, राज्याचे पर्यटन मंत्री मंगल प्रभात लोढा आणि आ. प्रसाद लाड यांनी छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांच्याविषयी केलेल्या अपमानकारक वक्तव्याच्या निषेधार्थ देऊळगाव राजा शहरात आज, गुरुवारी कडकडीत बंद पाळण्यात आला. सर्वधर्मीय शिवप्रेमींच्या वतीने शहरात निषेध मोर्चा काढून राज्यपालांची हकालपट्टी करण्याची मागणी करण्यात आली.

हेही वाचा >>>भंडारा: बापरे!… हत्ती की रोनाल्डो; फुटबॉलसारखी उडवली दुचाकी

Mallikarjun Kharge criticizes Dalit oppression in Narendra Modi Maharashtra state
मोदींच्या राज्यात दलितांवर अत्याचार; मल्लिकार्जुन खरगे यांची टीका
bjp rajput voters in up
उत्तर प्रदेशमध्ये भाजपा अडचणीत! तिकीट वाटपावरून राजपूत समुदाय पक्षावर नाराज
MP Udayanraje Bhosale reacts on being in touch with Sharad Pawar
सातारा: तुतारीचे काय, त्या आमच्या वाड्यातही वाजतात- उदयनराजे
Complaint against Fadnavis
फडणवीस व भाजप उमेदवार राम सातपुतेंविरुद्ध आचार संहिता भंग केल्याची तक्रार, मोची समाजाला प्रलोभन दाखविण्याचा आरोप

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले-सावित्रीबाई फुले यांच्या संदर्भात केलेल्या अवमानकारक वक्तव्याच्या निषेधार्थ शिवप्रेमींनी शहर बंदची हाक दिली होती. बंदमध्ये शहरातील सर्वधर्मीय शिवभक्तांसह राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस सेवादल, शिवसंग्राम संघटना, शिवसेना शिंदे गट, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष, पीरिपा, मनसे, छावा संघटना यांच्यासह विविध संघटनेच्या नेत्यांनी सक्रिय सहभाग दर्शवला. शहरवासीयांनी आपली दुकाने बंद ठेवून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. दरम्यान, शहरातून निषेध मोर्चा काढून राज्यपालांच्या निषेधार्थ प्रचंड घोषणाबाजी करण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापासून मोर्चाला सुरुवात झाली.

हेही वाचा >>>अकोला: पत्नीच्या शोधात सासरी गेला, वाद झाला अन् पुढे घडले असे की पोलिसही चक्रावले…

चिखली रोडवरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा, भगवान बाबा चौक, अहिंसा मार्गावरून जुनी नगर परिषद चौक ते बस स्थानक चौकात मोर्चाचे निषेध सभेत रूपांतर झाले. यावेळी रामप्रसाद शेळके, गोविंद झोरे, उद्धव मस्के, गणेश सवडे, दीपक बोरकर, अर्पित मिनासे, सिद्दीकी शेट मिर्चीवाले, काशिफ कोटकर, संतोष खांडेभराड, विष्णू रामाने, बाळराजे देशमुख, सुनील शेजुळकर, आदींनी तीव्र शब्दात आपल्या भावना व्यक्त करून राज्यपालांची हकालपट्टीची मागणी केली. बंद यशस्वी करण्यासाठी राजेश इंगळे, गजानन काकड, विष्णू झोरे, गजानन तिडके, संतोष राजे जाधव, लक्ष्मण कव्हळे, बंडू डोळस, दत्ता काळे यांनी आवाहन केले. निषेध सभेत आकाश कासारे, जहीर पठाण, अजमत खान, नीलेश गीते, राजीव सिरसाट, प्रकाश बस्सी, अजय शिवरक, कदिर शेख, हनिफ शाह, गणेश बुरकुल, अतिष खराट, यांच्या सह असंख्य शिवप्रेमी उपस्थित होते.