बुलढाणा: राज्यपालांसह, भाजप नेत्यांविरोधात सर्वधर्मीय शिवप्रेमी आक्रमक; देऊळगावराजा शहर कडकडीत बंद | All religious Shiv Premi movement against BJP leaders including Governor scm 61 amy 95 | Loksatta

बुलढाणा: राज्यपालांसह, भाजप नेत्यांविरोधात सर्वधर्मीय शिवप्रेमी आक्रमक; देऊळगावराजा शहर कडकडीत बंद

राज्यपालांच्या हकालपट्टीची मागणी

बुलढाणा: राज्यपालांसह, भाजप नेत्यांविरोधात सर्वधर्मीय शिवप्रेमी आक्रमक; देऊळगावराजा शहर कडकडीत बंद
राज्यपालांसह, भाजप नेत्यांविरोधात सर्वधर्मीय शिवप्रेमी आक्रमक

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी, भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी, केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे, राज्याचे पर्यटन मंत्री मंगल प्रभात लोढा आणि आ. प्रसाद लाड यांनी छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांच्याविषयी केलेल्या अपमानकारक वक्तव्याच्या निषेधार्थ देऊळगाव राजा शहरात आज, गुरुवारी कडकडीत बंद पाळण्यात आला. सर्वधर्मीय शिवप्रेमींच्या वतीने शहरात निषेध मोर्चा काढून राज्यपालांची हकालपट्टी करण्याची मागणी करण्यात आली.

हेही वाचा >>>भंडारा: बापरे!… हत्ती की रोनाल्डो; फुटबॉलसारखी उडवली दुचाकी

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले-सावित्रीबाई फुले यांच्या संदर्भात केलेल्या अवमानकारक वक्तव्याच्या निषेधार्थ शिवप्रेमींनी शहर बंदची हाक दिली होती. बंदमध्ये शहरातील सर्वधर्मीय शिवभक्तांसह राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस सेवादल, शिवसंग्राम संघटना, शिवसेना शिंदे गट, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष, पीरिपा, मनसे, छावा संघटना यांच्यासह विविध संघटनेच्या नेत्यांनी सक्रिय सहभाग दर्शवला. शहरवासीयांनी आपली दुकाने बंद ठेवून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. दरम्यान, शहरातून निषेध मोर्चा काढून राज्यपालांच्या निषेधार्थ प्रचंड घोषणाबाजी करण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापासून मोर्चाला सुरुवात झाली.

हेही वाचा >>>अकोला: पत्नीच्या शोधात सासरी गेला, वाद झाला अन् पुढे घडले असे की पोलिसही चक्रावले…

चिखली रोडवरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा, भगवान बाबा चौक, अहिंसा मार्गावरून जुनी नगर परिषद चौक ते बस स्थानक चौकात मोर्चाचे निषेध सभेत रूपांतर झाले. यावेळी रामप्रसाद शेळके, गोविंद झोरे, उद्धव मस्के, गणेश सवडे, दीपक बोरकर, अर्पित मिनासे, सिद्दीकी शेट मिर्चीवाले, काशिफ कोटकर, संतोष खांडेभराड, विष्णू रामाने, बाळराजे देशमुख, सुनील शेजुळकर, आदींनी तीव्र शब्दात आपल्या भावना व्यक्त करून राज्यपालांची हकालपट्टीची मागणी केली. बंद यशस्वी करण्यासाठी राजेश इंगळे, गजानन काकड, विष्णू झोरे, गजानन तिडके, संतोष राजे जाधव, लक्ष्मण कव्हळे, बंडू डोळस, दत्ता काळे यांनी आवाहन केले. निषेध सभेत आकाश कासारे, जहीर पठाण, अजमत खान, नीलेश गीते, राजीव सिरसाट, प्रकाश बस्सी, अजय शिवरक, कदिर शेख, हनिफ शाह, गणेश बुरकुल, अतिष खराट, यांच्या सह असंख्य शिवप्रेमी उपस्थित होते.

मराठीतील सर्व नागपूर / विदर्भ ( Nagpur ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 08-12-2022 at 19:56 IST
Next Story
बापरे! चिडलेल्या हत्तीने फुटबॉलसारखी उडवली समोरची दुचाकी, तरुणाचा जीव थोडक्यात वाचला, पाहा VIDEO