नागपूर : २६ जानेवारीला प्रदर्शित होणाऱ्या 'गांधी गोडसे एक युद्ध' या चित्रपटाच्या निमित्ताने नवा वाद निर्माण होण्याचे संकेत मिळाले आहेत. या चित्रपटात नथुरामला खलनायक ठरवण्याचा प्रयत्न झाल्यास चित्रपटगृहांसमोर निदर्शने करून चित्रपट बंद पाडण्यात येईल, असा इशारा अमर हुतात्मा हिंदू महासभेचे राष्ट्रीय अध्यक्ष संदीप काळे यांनी प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे. नाथूरामांची बाजू योग्य पद्धतीने मांडल्यास चित्रपट करमुक्त करावा, अशी मागणीही त्यांनी केली आहे. हेही वाचा - देशातील रस्ते बांधणी : गडकरींनी केली दहापट अधिक गुंतवणूक हेही वाचा - विदर्भात गुंतवणूक करण्यासाठी दावोसमध्ये करार करणाऱ्या तीन कंपन्या महाराष्ट्रातीलच काळे यांनी प्रसिद्धीला दिलेल्या निवेदनानुसार, या चित्रपटात गांधी व गोडसे यांची बाजू या संदर्भातील खटल्यातील न्यायालयीन तपशीलानुसार मांडली आहे. नथुरामच्या निवेदनाशी छेडछाड करून त्यांना 'खलनायक' म्हणून दाखविले गेल्यास 'अमर हुतात्मा हिंदू महासभा' या चित्रपटाचा तीव्र विरोध करेल व चित्रपटगृहांसमोर निदर्शने करून चित्रपट बंद पाडण्यात येईल, असा इशारा संघटनेचे अध्यक्ष संदीप काळे यांनी दिला आहे.