scorecardresearch

Premium

“भाजपा आणि बावनकुळेंमध्ये आता दम नाही”, अंबादास दानवेंचे विधान, म्हणतात..

दानवे म्हणाले, भाजपामध्ये नेतृत्वाचा अभाव आहे. त्यामुळेच त्यांना बाहेरच्या पक्षातून नेते आयात करावे लागते. परंतु भाजपाने कितीही प्रयत्न केले तरी शेवटी जनता त्यांना उत्तर देणार आहे.

Ambadas Danve criticizes BJP
"भाजपा आणि बावनकुळेंमध्ये आता दम नाही", अंबादास दानवेंचे विधान, म्हणतात.. (छायाचित्र – लोकसत्ता ग्राफिक्स)

नागपूर : भारतीय जनता पक्ष (भाजपा) आणि या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यात आता दम (राजकीय शक्ती) राहिला नाही. त्यामुळे त्यांना बाहेरच्या पक्षातून नेते आणावे लागतात, असा टोला विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी लगावला.

नागपुरातील अंबाझरीसह पूरग्रस्त भागाचा दौरा केल्यावर ते पत्रपरिषदेत बोलत होते. भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी अलीकडेच राज्यात अनेक नेते भाजपामध्ये येणार असल्याचे वक्तव्य केले होते. त्यावर दानवे म्हणाले, भाजपामध्ये नेतृत्वाचा अभाव आहे. त्यामुळेच त्यांना बाहेरच्या पक्षातून नेते आयात करावे लागते. परंतु भाजपाने कितीही प्रयत्न केले तरी शेवटी जनता त्यांना उत्तर देणार आहे.

Congress protest
राहुल गांधींचं रावणाच्या रुपात पोस्टर, मुंबईत काँग्रेस आक्रमक; वडेट्टीवार म्हणाले, “भाजपाला स्वतःची लंका…”
Maratha Seva Union
आरक्षणासाठी मराठा सेवा संघ आक्रमक; दुर्लक्ष करणाऱ्या लोकप्रतिनिधींना धडा शिकविण्याचा निर्धार
Chandrashekhar Bawankule (1)
“…तर विरोधकांना तोंड दाखवणं कठीण होईल”, बावनकुळेंच्या विधानावरील टीकेवर भाजपाचं प्रत्युत्तर
Supriya Sule
“पत्रकारांना चहा प्यायला न्या”, बावनकुळेंच्या विधानावर सुप्रिया सुळेंची संतप्त प्रतिक्रिया; म्हणाल्या, “भाजपाने एकतर…”

हेही वाचा – नागपूर : दोनशे ‘लॅपटॉप’ निकामी, नेमके घडले काय ?

हेही वाचा – “मुंबईची तुंबई म्हणून बदनामी, नागपूरचा पूर राजकीय अपयश”, अंबादास दानवेंचे विधान, म्हणतात..

सध्या एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेलेल्या आमदार-खासदारांना लोक गद्दार-खोकेबाज म्हणून ओळखतात. त्यामुळे त्यांची प्रतिमाच नसल्याने त्यांच्या बदनामीचा प्रश्नच काय? असा प्रश्न दानवे यांनी उपस्थित केला. सरकारने ५० टक्यांची मर्यादा हटवून मराठ्यांना वेगळे आरक्षण द्यायला हवे. त्यांच्या आरक्षणाने ओबीसी वा इतरांना फटका बसू नये, असेही दानवे म्हणाले.

Latest Comment
View All Comments
Post Comment

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Ambadas danve criticizes bjp and chandrasekhar bawankule mnb 82 ssb

First published on: 26-09-2023 at 16:06 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×