समृद्धी महामार्गावर कारंजा टोल प्लाझा परिसरात आज, सोमवारी सकाळी ४ वाजतादरम्यान चिपळूणकडून मध्यप्रदेशातील कटनी येथे मृतदेह घेऊन जाणाऱ्या रुग्णवाहिका (क्रमांक एम.एच.१४ एच. जी. ०४६६) चालकाला डुलकी आल्याने रुग्णवाहिका उभ्या ट्रकला धडकली. या दुर्घटनेत पाच जण गंभीर जखमी झाले असून त्यांना कारंजा उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हेही वाचा >>>पोलीस हवालदारांची पदोन्नती अखेर मार्गी कोकणातील चिपळूणकडून नागपूरमार्गे मध्यप्रदेश राज्यातील कटनी येथे मृतदेह घेऊन जाणाऱ्या रुग्णवाहिका चालकाला डुलकी आल्याने कारंजा टोल प्लाझाजवळ उभ्या ट्रकला रुग्णाहिका धडकली. यामधे अनिकेत देवळेकर (२५), सुरज आदिवासी (२४), देवबाती आदिवासी (३०), सुखी आदिवासी (२८), संगीता आदिवासी (२७) सर्व रा. कटनी, मध्यप्रदेश हे गंभीर जखमी झाले. अपघाताची माहिती मिळतात पायलट नंदकिशोर आरेकर, डॉ. मुबारशीर शेख आणि समृद्धी १०८ रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाली. जखमींना तातडीने कारंजा उपजिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले. वैद्यकीय अधिकारी कटारिया, नर्स ऐश्वर्या खिल्लारे, कक्षसेवक सचिन हनुमंते, सुरक्षा रक्षक वैभव घुले, वेदांत रुग्णवाहिकेचे रुग्णसेवक शंकर रामटेके, गुरुमंदिर रुग्णवाहिकेचे रुग्णसेवक रमेश देशमुख यांनी जखमींना मदत केली.