दिव्यशक्ती आणि चमत्काराचा दावा करणाऱ्या बागेश्वर धामचे वादग्रस्त धीरेंद्र कृष्ण महाराज यांनी संत तुकाराम महाराजांबद्दल केलेल्या आक्षेपार्ह विधानानंतर त्यांच्यावर विविध स्तरातून टीका होत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनीही या विधानावरून संताप व्यक्त केला आहे. धीरेंद्र कृष्ण महाराज जिथे दिसेल तिथे ठोकून काढा, असं ते म्हणाले. अकोल्यात टीव्ही ९ वृत्तवाहिनीशी बोलताना त्यांनी यासंदर्भात प्रतिक्रिया दिली.

हेही वाचा – पक्षनाव आणि धनुष्यबाण चिन्ह कोणाकडे ? कागदपत्रे सादर करण्याची मुदत आज संपुष्टात

MP Dhananjay Mahadik, Leads Campaign for Mahayuti, Sanjay Mandlik, Kolhapur lok sabha seat, Rajarampuri peth, Shahupuri peth, people united to campaign,
संजय मंडलिक यांच्या प्रचारार्थ पदफेरीत राजारामपूरी, शाहूपूरी व्यापारी पेठ एकवटली
virendra mandlik criticizes shahu chhatrapati s family
छत्रपती कुटुंबाने राजर्षी शाहू महाराजांच्या नावाला साजेसे काम केले नाही; मंडलिक घराण्याची पुन्हा एकदा टीका
Sanyogeetaraje Chhatrapati
कोल्हापूर जिल्ह्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी शाहू महाराज सक्षम उमदेवार – युवराज्ञी संयोगिताराजे छत्रपती
nagpur and bhandara,dhirendra shastri, bageshwar dham, controversial statement, jumdev maharaj, followers, Sparks Outrage, fir register, arrest demand, maharashtra, marathi news,
बागेश्वर बाबा वादग्रस्त विधानाने पुन्हा चर्चेत, जुमदेव महाराजांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य; भंडारा, नागपूरमध्ये तणाव

काय म्हणाले अमोल मिटकरी?

“शिंदे सरकार सत्तेत आल्यानंतर राज्यात बुवा-बाबांचं पीक फोफावलं आहे. पळपुटा आणि अक्कलशून्य असलेला बागेश्वर बाबा, त्याला श्याम मानव यांनी ४० लाखांचं बक्षिस जाहीर केलं होतं. तोच बागेश्वर आज संत तुकाराम महाराजांच्या धर्मपत्नीवर बोलतो आहे. आईसाहेब उर्फ जिजाबाई स्वत: भंडारा डोंगरावर त्यांच्या पतीची सेवा करत होत्या. तुकोबांचा प्रचंड अभिमान असणाऱ्या आईसाहेबांबद्दल ज्या पातळीवर जाऊन त्याने विधान केलं आहे. मला असं वाटतं की वारकरी सांप्रदाय काय आहे, हे या वेड्याला माहिती नाही”, अशी टीका अमोल मिटकरी यांनी केली.

हेही वाचा – धीरेंद्र कृष्ण शास्त्रींच्या तुकाराम महाराजांवरील वादग्रस्त विधानानंतर सुप्रिया सुळे संतापल्या; म्हणाल्या “आपण…”

“जिथे दिसेल, तिथे ठोकून काढा”

“धीरेंद्र शास्त्री सारखी कोल्हेकुई जेव्हा सुरू असते, त्यावर तुकोबांनी सांगितलं आहे. ”अवघे कोलियाचे वर्म अंडी घातलिया, तोंडी खीळ पडे” अशा बदमाशांच्या नाजूक भागावर हल्ला केला तर यांचं थोबाड बंद होतं. त्यामुळे वारकरी सांप्रदायाला आणि त्याचा अधिष्ठानाला जर असा पापी आणि बेअक्कल असलेला महाराज काही बोलत असेल, तर मला असं वाटतं की वारकरी सांप्रदायाने याची गंभीर दखल घ्यावी. हा जिथे दिसेल, तिथे याला ठोकून काढा”, असेही ते म्हणाले.

हेही वाचा – नागपुरातील कोळसा व्यापाऱ्याला मागितली १ कोटीची खंडणी; तीन पत्रकारांसह चौघांना अटक

धीरेंद्र कृष्ण शास्त्री महाराज नेमकं काय म्हणाले होते?

धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांचा एक व्हिडीओ सध्या समाजमाध्यमांवर चांगलाच व्हायरल होत असून या व्हिडीओमध्ये ते संत तुकाराम महाराज यांच्याविषयी बोलताना दिसत आहेत. संत तुकाराम महाराज यांची पत्नी त्यांना रोज मारहाण करायची, असा दावा धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांनी केला आहे. “संत तुकाराम महाराज महाराष्ट्रातील एक महात्मा आहेत. त्यांची पत्नी त्यांना रोज मारहाण करायची. याच कारणामुळे त्यांना एका व्यक्तीने विचारले की तुमची पत्नी तुम्हाला रोज मारहाण करते, मग तुम्हाला वाईट वाटत नाही का? या प्रश्नाचे संत तुकाराम महाराजांनी उत्तर दिले. ते म्हणाले की, देवाची कृपा आहे की मला मारहाण करणारी पत्नी भेटली. मला प्रेम करणारी पत्नी भेटली असती, तर मी देवाच्या प्रेमात पडलोच नसतो. मी पत्नीच्याच प्रेमात गुरफटून गेलो असतो. मला मारहाण करणारी बायको मिळाली आहे, त्यामुळे मला प्रभू राम यांची भक्ती करण्याची संधी मिळते, असे संत तुकाराम महाराज म्हणाले होते.” असे ते म्हणाले.