scorecardresearch

MLC Election : निवडणुकीतील पराभवानंतर आमदार संजय गायकवाड यांचा गौप्यस्फोट, म्हणाले “भाजपने विश्वासातच घेतले असते तर…”

अमरावती विभाग पदवीधर मतदारसंघाच्या लढतीत भाजपने आम्हाला विश्वासात घेतले नसल्याचा गौप्यस्फोट शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी येथे केला.

sanjay gaikwad bjp
(फोटो-लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

बुलढाणा : अमरावती विभाग पदवीधर मतदारसंघाच्या लढतीत भाजपने आम्हाला विश्वासात घेतले नसल्याचा गौप्यस्फोट शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी येथे केला. तसे झाले असते तर पदवीधरचा निकाल वेगळाच लागला असता, असा दावाही त्यांनी बोलून दाखवला. आज दुपारी जाहीर झालेल्या निकालानंतर प्रसिद्धी माध्यमांशी चर्चा करताना बाळासाहेबांच्या शिवसेनेचे जिल्हा संपर्क प्रमुख आमदार संजय गायकवाड यांनी परखड प्रतिक्रिया व्यक्त करतानाच मित्रपक्षाच्या नेत्यांना दोन खडे बोल सुनावले.

हेही वाचा >>> पहिल्याच लढतीत लिंगाडे ठरले ‘जायंट किलर’!, रणजीत पाटलांची ‘हॅट्रिक’ हुकवली अन् मंत्रिपदाची संधीही…

प्रचारात भाजपने आम्हाला विश्वासात घेतले नसल्याचा पुनरुच्चार करून ते म्हणाले की, जिल्ह्यात आमचा खासदार आहे, दोन आमदार आहेत. त्यामुळे त्यांनी आम्हाला सोबत घेतले असते तर पंधरा-वीस हजारांचे मतदान दिले असते, असा दावाही गायकवाड यांनी केला. मात्र, हा विजय आघाडीचा नसून बारा वर्षांपासून रणजीत पाटील आमदार असल्याने त्यांच्या विरुद्ध ‘अँटी इंकंबन्सी’ हा घटक पराभवात महत्त्वाचा घटक ठरला. तसेच जुनी पेन्शन हा कळीचा मुद्धा ठरल्याचे ते म्हणाले.

मराठीतील सर्व नागपूर / विदर्भ ( Nagpur ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 03-02-2023 at 17:26 IST
ताज्या बातम्या