अमरावती पदवीधर मतदारसंघ निवडणूक : आघाडीचे धीरज लिंगाडे यांना विजयाची खात्री, म्हणाले... | Amravati Graduate Constituency Election Dheeraj Lingade assured about victory in election | Loksatta

अमरावती पदवीधर मतदारसंघ निवडणूक : आघाडीचे धीरज लिंगाडे यांना विजयाची खात्री, म्हणाले…

MLC election update maharashtra 2023 अमरावती पदवीधर मतदारसंघाच्या आज, गुरुवारी सुरू असलेल्या मतमोजणीसाठी आघाडीचे उमेदवार धीरज लिंगाडे हे संतनगरी शेगावमार्गे अमरावतीत दाखल झाले.

dheeraj lingade
आघाडीचे धीरज लिंगाडे यांना विजयाची खात्री (फोटो-लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

बुलढाणा : Maharashtra mlc election result 2023 अमरावती पदवीधर मतदारसंघाच्या आज, गुरुवारी सुरू असलेल्या मतमोजणीसाठी आघाडीचे उमेदवार धीरज लिंगाडे हे संतनगरी शेगावमार्गे अमरावतीत दाखल झाले. त्यापूर्वी शेगावात प्रसिद्धी माध्यमासोबत बोलताना त्यांनी आपणास विजयाची खात्री असल्याचे आत्मविश्वासपूर्वक सांगितले. राजकारणात नेते नव्हे तर मतदार खऱ्या अर्थाने दिग्गज असतात असे सूचक विधानही त्यांनी केले.

हेही वाचा >>> MLC Election Result : मोठी बातमी, नागपुरात भाजपला धक्का; मविआचे अडबाले सात हजार मतांनी विजयी

मतदानानंतरदेखील चुरस व निकालाची अनिश्चितता कायम असलेल्या अमरावती पदवीधरच्या लढतीत मावळते आमदार रणजित पाटील यांना  लिंगाडे यांनी तुल्यबळ लढत दिल्याचे चित्र आहे. आज सकाळी बुलढाणा येथून शेगावमार्गे लिंगाडे अमरावतीकडे रवाना झाले. शेगाव नगरीत संत गजानन महाराजांच्या समाधी स्थळाचे दर्शन घेतले. कोणत्याही शुभप्रसंगी श्री चरणी नतमस्तक होण्याची परंपरा आपण   पूर्वीपासूनच जोपासली असल्याचे त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले. यावेळी त्यांनी स्वतःच्या विजयाचा दावा केला. अमरावतीत आघाडी विजयी होणारच असे ते म्हणाले. आघाडीच्या मित्र पक्षांनी व विविध संघटनांनी आपल्या प्रचारासाठी परिश्रम घेतले. त्याचे फळ निश्चितच मिळणार, असा विश्वास लिंगाडे यांनी बोलून दाखविला.

मराठीतील सर्व नागपूर / विदर्भ ( Nagpur ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 02-02-2023 at 15:15 IST
Next Story
MLC Election Result Today 2023 : नागपूर ‘शिक्षक’मध्ये निकालाचा प्राथमिक कल मविआच्या बाजूने