अमरावती :‎ शिवसेनेचे माजी खासदार आनंदराव अडसूळ आणि आपण अमरावती जिल्‍ह्यातील शिवसैनिकांच्‍या संपर्कात आहोत. युतीमध्‍ये अमरावती लोकसभा मतदारसंघ गेल्‍या कित्‍येक वर्षांपासून शिवसेनेचा बालेकिल्‍ला राहिलेला आहे. त्‍यामुळे अमरावती लोकसभेचा खासदार शिवसेनेचाच होणार, असा दावा शिवसेनेच्‍या शिंदे गटाचे नेते माजी आमदार अभिजीत अडसूळ यांनी केला आहे.

येत्‍या निवडणुकीत विद्यमान खासदार नवनीत राणा यांच्‍या विजयाचा मार्ग सुकर व्‍हावा, यासाठी आनंदराव अडसूळ आणि राणा दाम्‍पत्‍यात समेट घडून आल्‍याची चर्चा काही माध्‍यमांमध्‍ये सुरू असताना अभिजीत अडसूळ यांनी ही चर्चा बिनबुडाची असल्‍याचे स्‍पष्‍ट केले आहे. अमरावती शिवसेनेचा बालेकिल्‍ला आहे आणि २०२४ च्‍या लोकसभा निवडणुकीतसुद्धा राहील, आम्‍ही कुणाशीही तडजोड केली नाही आणि करणार नाही, असे अभिजीत अडसूळ यांनी म्‍हटले आहे. अभिजीत अडसूळ हे आनंदराव यांचे सुपूत्र आहेत.

Jayashree Kurane of Tararani Party is nominated in Hatkanangale
हातकणंगलेत ताराराणी पक्षाच्या जयश्री कुरणे यांची उमेदवारी
how does suiceide pod work
इच्छामरणासाठी तयार करण्यात आलेले ‘सुसाईड पॉड’ काय आहेत? हे मशीन कसे कार्य करते? याची चर्चा का होत आहे?
Vijay Wadettiwar, Congress MP, Chandrapur,
वडेट्टीवार यांना पराभूत करा, कॉंग्रेस खासदाराचे अप्रत्यक्ष आवाहन
Eknath shinde ganesh naik dispute marathi news
१४ गावांवरून नाईक-मुख्यमंत्री वाद?
Arvind Chavan, NCP, Ajit Pawar, Jalna Assembly Constituency, mahayuti, Shiv Sena, Arjun Khotkar,
जालन्यात अजित पवार गट आग्रही
Former Indapur MLA Harshvardhan Patil is rumored to be going to NCP Sharad Chandra Pawar party pune
हर्षवर्धन पाटीलांचा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटात प्रवेश कठीण? इंदापूरमध्ये इच्छुकांची संख्या जास्त
Supriya Sule, Baramati Assembly, Supriya Sule on Baramati Assembly, candidate, Ajit Pawar, Jay Pawar , Yugendra Pawar, NCP, Sharad Pawar
बारामती विधानसभा उमेदवाराबद्दल खासदार सुप्रिया सुळेंचे मोठे वक्तव्य !
Dispute between two groups in Maharashtra Navnirmansena meeting in Chandrapur
मनसेच्या बैठकीत राडा, राज ठाकरेंनी सभास्थळ सोडताच दोन गट भिडले

हेही वाचा – वर्धा : सुमित वानखेडे उत्तम नेते असल्याचा आमदार दादाराव केचे यांना साक्षात्कार, म्हणाले ते सर्वांना..

आनंदराव अडसूळ आणि राणा दाम्‍पत्‍यामधील वाद सर्वश्रुत आहे. २०१९ च्‍या निवडणुकीत नवनीत राणा यांनी अडसूळ यांचा पराभव केला होता. राज्‍यात सत्तांतरानंतर अडसूळ यांनी शिवसेनेच्‍या पक्षनेतेपदाचा राजीनामा दिला. ठाकरे गटातून त्‍यांची हकालपट्टी करण्‍यात आली. त्‍यांनी एकनाथ शिंदे यांची साथ देण्‍याचा निर्णय घेतला. मध्‍यंतरीच्‍या काळात अडसूळ यांना ईडीच्‍या नोटीस बजावण्‍यात आल्‍या, त्‍याचीही बरीच चर्चा झाली होती.

राणा दाम्‍पत्‍याने भाजपा सरकारला पाठिंबा दिला आहे, तर अडसूळ हे एकनाथ शिंदे यांच्‍या बाजूने आहेत. अडसूळ आणि राणा दाम्‍पत्‍य हे शिंदे-फडणवीस सरकारचे समर्थक असले, तरी लोकसभेसाठी दोघांमध्‍ये स्‍पर्धा अजूनही असल्‍याचे अभिजीत अडसूळ यांच्‍या वक्‍तव्‍यातून ध्‍वनित झाले आहे. आनंदराव अडसूळ यांच्या पराभवामागे भाजपाचाच हात असल्याचा आरोप अभिजीत अडसूळ यांनी गेल्‍या निवडणुकीनंतर लगेच केला होता. भाजपाचे अनेक नगरसेवक मतदानाच्या वेळी बेपत्ता होते, असेही अभिजीत अडसूळ यांचे म्हणणे होते.

हेही वाचा – नितीन गडकरींनी उलगडला शैक्षणिक प्रवास; म्हणाले, “मला इंजिनिअर व्हायचे होते, पण डॉक्टर झालो, तरीही…”

आनंदराव अडसूळ यांनी खासदार नवनीत राणा यांच्या जात प्रमाणपत्रावर आक्षेप घेत मुंबई उच्‍च न्‍यायालयात याचिका दाखल केली होती. या याचिकेवर न्यायालयाने निकाल देताना जात प्रमाणपत्र रद्द करून नवनीत राणा यांना दोन लाखांचा दंड ठोठावला होता. या निकालास राणा यांनी सर्वोच्‍च न्‍यायालयात आव्‍हान दिले होते, हे प्रकरण सध्‍या न्‍यायप्रविष्‍ट आहे.