scorecardresearch

प्रवाशांसाठी आनंदवार्ता; अमरावती-पुणे-अमरावती द्विसाप्‍ताहिक‍ विशेष एक्‍स्‍प्रेसला मुदतवाढ

मध्‍य रेल्‍वेने प्रवाशांची गर्दी लक्षात घेता अमरावती ते पुणे (लातूरमार्गे) द्विसाप्‍ताहिक विशेष एक्‍स्‍प्रेसला मुदतवाढ देण्‍याचा निर्णय घेतला.

Amravati Pune Amravati Express
प्रवाशांसाठी आनंदवार्ता; अमरावती-पुणे-अमरावती द्विसाप्‍ताहिक‍ विशेष एक्‍स्‍प्रेसला मुदतवाढ (प्रातिनिधिक छायाचित्र)

अमरावती : मध्‍य रेल्‍वेने प्रवाशांची गर्दी लक्षात घेता अमरावती ते पुणे (लातूरमार्गे) द्विसाप्‍ताहिक विशेष एक्‍स्‍प्रेसला मुदतवाढ देण्‍याचा निर्णय घेतला असून या रेल्‍वेगाडीच्‍या ८ फेऱ्या वाढविण्‍यात आल्‍या आहेत.

०१४३९ पुणे-अमरावती विशेष एक्‍स्‍प्रेस दर शुक्रवारी आणि रविवारी पुणे रेल्‍वे स्‍थानकावरून रात्री २२.५० वाजता सुटणार असून दुसऱ्या दिवशी सायंकाळी १७.३० वाजता अमरावती रेल्‍वे स्‍थानकावर पोहोचणार आहे. १ डिसेंबरपर्यंत या रेल्‍वेगाडीच्‍या चार फेऱ्यांचे नियोजन करण्‍यात आले आहे.
०१४४० अमरावती-पुणे विशेष एक्‍स्‍प्रेस दर शनिवारी आणि सोमवारी रात्री १९.५० वाजता अमरावती रेल्‍वे स्‍थानकावरून सुटणार असून दुसऱ्या दिवशी दुपारी १६.२० वाजता पुणे स्‍थानकावर पोहोचणार आहे. येत्‍या २ डिसेंबरपर्यंत या रेल्‍वेगाडीच्‍या चार फेऱ्यांचे नियोजन करण्‍यात आले आहे.

Mumbai Parbandar Project
मुंबई पारबंदर प्रकल्प : सागरी सेतूचे संचालन; देखभालीसाठी लवकरच आंतरराष्ट्रीय कंत्राटदाराची नियुक्ती
modak Vande Bharat train passengers
मुंबई : वंदे भारतमधील प्रवाशांनी घेतला मोदकाचा आस्वाद
MMRDA,Mumbai Metropolitan Region Development Authority , Mumbai Parbandar Project ,MMRDA, Mumbai , Mumbai news,
शिवडी – नवी मुंबई अतिवेगवान प्रवासाला डिसेंबरचा मुहूर्त; मुंबई पारबंदर प्रकल्पाचे ९६.६ टक्के काम पूर्ण
mumbai goa highway
गणेशभक्तांचा परतीचा प्रवास खडतर? गोवा महामार्गाच्या मुंबई मार्गिकेकडे दुर्लक्ष

हेही वाचा – छठ पूजा: हा बिहारचा महत्त्वाचा सण का आहे?

हेही वाचा – विश्लेषण : पुन्हा हातातोंडाशी विजेतेपद… पुन्हा अपयश! भारतीय क्रिकेट संघ नेमका कुठे चुकला?

या रेल्‍वेगाड्यांना बडनेरा, मुर्तिजापूर, अकोला, वाशीम, हिंगोली, बसमत, पुर्णा, परभणी, परळी वैजनाथ, लातूर रोड, लातूर, उस्‍मानाबाद, बार्शी टाऊन, कुर्डूवाडी, जेऊर, जिंती रोड, दौंड, केडगाव, उरळी या रेल्‍वे स्‍थानकांवर थांबा राहणार आहे.

Latest Comment
View All Comments
Post Comment

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Amravati pune amravati biweekly special express has been extended mma 73 ssb

First published on: 20-11-2023 at 15:04 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×