scorecardresearch

Premium

‘अमरावती-पुणे-अमरावती’ एसटीसाठी ठरले लाभदायी; १८२ फेऱ्यांमधून ३८ लाखांचे उत्‍पन्न

सणासुदीच्‍या काळात अमरावती ते पुणे ये-जा करणाऱ्या प्रवाशांची संख्‍या मोठ्या प्रमाणावर वाढते. दिवाळीच्‍या दिवसांत महाराष्‍ट्र राज्‍य मार्ग परिवहन महामंडळाच्‍या अमरावती विभागाने नियमित फेऱ्यांसोबतच विशेष योजना राबविली.

Amravati Pune Amravati travel
'अमरावती-पुणे-अमरावती' एसटीसाठी ठरले लाभदायी; १८२ फेऱ्यांमधून ३८ लाखांचे उत्‍पन्न (प्रतिनिधिक छायाचित्र)

अमरावती : सणासुदीच्‍या काळात अमरावती ते पुणे ये-जा करणाऱ्या प्रवाशांची संख्‍या मोठ्या प्रमाणावर वाढते. दिवाळीच्‍या दिवसांत महाराष्‍ट्र राज्‍य मार्ग परिवहन महामंडळाच्‍या अमरावती विभागाने नियमित फेऱ्यांसोबतच विशेष योजना राबविली. अमरावती विभागातर्फे तब्‍बल २५ बसगाड्यांची व्‍यवस्‍था करण्‍यात आली होती. पुणे ते अमरावती दरम्‍यान १०२ फेऱ्या आणि अमरावती ते पुणे दरम्‍यान ८० फेऱ्यांची वाहतूक करण्‍यात आली. अशा एकूण १८२ फेऱ्यांमधून एसटी महामंडळाला ३८ लाख १ हजार रुपयांचे उत्‍पन्‍न मिळाले आहे.

अमरावती-पुणे-अमरावती या प्रवास व्‍यवस्‍थेचा लाभ एकूण ९ हजार ४५६ प्रवाशांनी घेतला. गेल्‍या वर्षी याच कालावधीत एसटी महामंडळाने ११४ फेऱ्यांचे नियोजन केले होते, त्‍यातून २८ लाख ३१ हजार रुपयांचे उत्‍पन्‍न मिळवले होते, तर ६ हजार २०० प्रवाशांची वाहतूक केली होती. यंदा प्रवाशांच्‍या संख्‍येत वाढ होण्‍यासोबतच उत्‍पन्‍नातही भरघोस वाढ झाली आहे. दिवाळीच्‍या वीस दिवसांमध्‍ये एसटी महामंडळाच्‍या अमरावती विभागाने ८ कोटी १६ लाख ४५ हजार रुपयांचे उत्‍पन्‍न मिळवले आहे. गेल्‍या वर्षी ६ कोटी ९४ लाख रुपये इतके उत्‍पन्‍न मिळाले होते.

Due to consecutive holidays Kolhapur is full of tourists and devotees
सलग सुट्ट्यांमुळे कोल्हापूर पर्यटक, भाविकांनी फुलले
protestor Morshi committed suicide
अमरावती : उपोषण मंडपातच आंदोलकाची गळफास घेऊन आत्‍महत्‍या
Pune collector on Maratha community survey
मराठा सर्वेक्षणात दुसऱ्या दिवशीही अडथळ्यांची शर्यत; जिल्हाधिकाऱ्यांनी घेतले ‘हे’ कठोर निर्णय
819 ambulances
राज्यात १०८ क्रमांकाच्या ८१९ रुग्णवाहिका वाढणार, आता ‘बोट’ आणि नवजात शिशू रुग्णवाहिका सेवा

हेही वाचा – गडचिरोली : ‘पीएलजीए’ सप्ताहाच्या पहिल्याच दिवशी नक्षल्यांची ‘बॅनरबाजी’, पोलीस यंत्रणा सतर्क

हेही वाचा – ताडोबात कॉलरवाली वाघिणीचा कुटुंबकबील्यासह संचार, पर्यटक सुखावले

भाडेवाढीचा परिणाम नाही

एसटी महामंडळाने प्रवासी भाड्यामध्‍ये केलेल्‍या १० टक्‍के भाववाढीचा विशेष परिणाम झालेला नाही. प्रवाशांची संख्‍या वाढण्‍यासोब‍तच उत्‍पन्‍नातही वाढ झाली आहे. लांब पल्‍ल्‍याच्‍या प्रवासी वाहतुकीसाठी एकूण ४०० फेऱ्यांचे नियोजन करण्‍यात येते. नियमित फेऱ्यांपैकी २५ टक्‍के उत्‍पन्‍न हे लांब पल्‍ल्‍याच्‍या वाहतुकीतून होत असते, असे महामंडळाच्‍या अधिकाऱ्यांचे मत आहे.

Latest Comment
View All Comments
Post Comment

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Amravati pune amravati travel turns out to be beneficial for st 38 lakhs revenue from 182 rounds mma 73 ssb

First published on: 02-12-2023 at 11:21 IST

आजचा ई-पेपर : नागपूर / विदर्भ

वाचा
epaper image

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×