Premium

अमरावतीचा श्रेणिक साकला ‘जेईई’मध्‍ये राज्‍यात अव्‍वल

नॅशनल टेस्टिंग एजन्‍सीच्‍या (एनटीए) वतीने घेण्‍यात आलेल्‍या ‘जेईई मेन्‍स सत्र २’ च्‍या परीक्षेत येथील महर्षी पब्लिक स्‍कूलचा विद्यार्थी श्रेणिक मोहन साकला हा शंभर टक्‍के गुण मिळवून राज्‍यात अव्‍वल आला आहे.

shrenik sakla
अमरावतीचा श्रेणिक साकला 'जेईई'मध्‍ये राज्‍यात अव्‍वल

अमरावती : नॅशनल टेस्टिंग एजन्‍सीच्‍या (एनटीए) वतीने घेण्‍यात आलेल्‍या ‘जेईई मेन्‍स सत्र २’ च्‍या परीक्षेत येथील महर्षी पब्लिक स्‍कूलचा विद्यार्थी श्रेणिक मोहन साकला हा शंभर टक्‍के गुण मिळवून राज्‍यात अव्‍वल आला आहे. या परिक्षेत देशभरातून २४ विद्यार्थी अव्‍वल आले असून त्‍यात श्रेणिकचा समावेश आहे. ‘जेईई मेन्‍स सत्र २’ ची परीक्षा २५ ते ३० जुलैदरम्‍यान घेण्‍यात आली होती. या परीक्षेचा निकाल ‘एनटीए’ने आज जाहीर केला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

श्रेणिकची ‘आयआयटी’मधून पुढील शिक्षण घेण्‍याची इच्‍छा असून ‘कॉम्‍प्‍यूटर सायन्‍स’मध्‍ये आपल्‍याला उच्‍च शिक्षण घ्‍यायला आवडेल, असे श्रेणिकने सांगितले. श्रेणिकने सीबीएसई इयत्‍ता बारावीच्‍या परीक्षेत भौतिकशास्‍त्र आणि रसायनशास्‍त्रात ९९ टक्‍के तर गणितात ९८ टक्‍के गुण मिळवले होते. करोना संकटामुळे दोन वर्षांपूर्वी टाळेबंदी लागू करण्यात आल्‍यानंतर ऑनलाईन शिक्षणावर भर देण्‍यात आला. पण, त्‍यामुळे आपण विचलित झालो नाही. आपण नेहमी स्‍वयंअध्‍ययनाकडे लक्ष दिले. दिवसातून केवळ सहा ते सात तास अभ्‍यास केला. परंतु, या दरम्‍यान माझी एकाग्रता ढासळू दिली नाही. माझी धाकटी बहीण यावर्षी इयत्‍ता दहावीची परीक्षा देत होती. त्‍यामुळे घरातील वातावरणही अनुकूल होते. आमच्‍या आईने अभ्‍यासाच्‍या वेळेत लक्ष विचलित होऊ नये, याची काळजी घेतली, असे श्रेणिकने सांगितले.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Amravati ranks top state shrenik sakla jee school students ysh

First published on: 08-08-2022 at 16:15 IST
Next Story
अमरावती जिल्‍ह्यात मुसळधार; वरूड तालुक्‍यात पूरस्थिती; बारा तासांत ९२ मिमी पाऊस