scorecardresearch

अकोला : बोरं देण्याच्या बहाण्याने नराधमाचा अल्पवयीन मुलावर अत्याचार

नराधमाने अल्पवयीन मुलाला डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या परिसरातील काटेरी झुडूपांमध्ये नेले. त्याठिकाणी त्याच्यावर अनैसर्गिक अत्याचार केला.

अकोला : बोरं देण्याच्या बहाण्याने नराधमाचा अल्पवयीन मुलावर अत्याचार
अकोल्यात अल्पवयीन मुलावर अत्याचार (प्रातिनिधिक छायाचित्र)

अकोला शहरातील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ परिसरात एका ११ वर्षीय अल्पवयीन मुलावर ५७ वर्षीय नराधमाने बोरं देण्याच्या बहाण्याने अनैसर्गिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी आरोपीला अटक करण्यात आली आहे.

हेही वाचा- नागपूर मेट्रो: शंकरनगर स्थानकावरचे स्कॅनर तर वासुदेव नगरचे तिकीट घर बंद

घराबाहेर खेळत असलेल्या ११ वर्षीय मुलावर एका ५७ वर्षीय नराधमाची नजर पडली. या नराधमाने मुलाला बोरं देण्याचे आमिष दाखवले. नराधमाने अल्पवयीन मुलाला डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या परिसरातील काटेरी झुडूपांमध्ये नेले. त्याठिकाणी त्याच्यावर अनैसर्गिक अत्याचार केला. हा प्रकार मुलाने घरी गेल्यावर आई-वडिलांना सांगितला. पालकांनी तातडीने सिव्हिल लाइन पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. या प्रकरणी पोलिसांनी भादंवि कलम ३७७ व पॉक्सो कायद्यानुसार गुन्हा दाखल करून आरोपीला तत्काळ अटक केली.

मराठीतील सर्व नागपूर / विदर्भ ( Nagpur ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 16-01-2023 at 13:10 IST

संबंधित बातम्या