नागपूर : गरीब व गरजू नागरिकांच्या वैद्यकीय उपचारासाठी समाजमाध्यमांवर आर्थिक मदतीचे (क्राऊड फंडिंग) आवाहन केले जाते. सध्या यावर सरकारचे कुठलेही नियंत्रण नसल्याने अनेकदा फसवणुकीचा धोका उद्भवतो. ही बाब टाळण्यासाठी सरकारने याबाबत नियमावली निश्चित करण्यासाठी वैद्यकीय शिक्षण आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली आहे.

गरीब व गरजू रुग्णांवरील वैद्यकीय उपचाराचा खर्च अनेकदा संबंधित कुटुंबाच्या क्षमतेबाहेर असतो. त्यामुळे निधी उभारणीसाठी समाजमाध्यमांवरून किंवा ऑनलाइन आर्थिक मदतीचे आवाहन केले जाते. अशा प्रकारे निधी संकलनाचे (क्राऊड फंडिंग) आवाहन करणारी अनेक संकेतस्थळे आहेत. अनेक जण सहानुभूतीपोटी या माध्यमातून आर्थिक मदत करतात. त्यातून गरीब रुग्णांना उपचारासाठी मदतही होते. मात्र अशा प्रकारे मदत गोळा करण्याबाबत सध्या राज्य शासनाची कोणतीही नियमावली किंवा निश्चित कार्यपद्धतीच अस्तित्वात नाही. अशा प्रकारातून रुग्णांच्या व्यथा व गरज लक्षात घेऊन मदत करणाऱ्या दानदात्याची फसवणूक होण्याचाही धोका उद्भवतो. यामुळे मदतीच्या मूळ उद्देशालाच धक्का बसण्याची शक्यता असल्याने भविष्यात असे प्रकार टाळण्यासाठी व उपचारासाठी निधी गोळा करण्याबाबत कार्यपद्धती ठरवण्याचा निर्णय राज्याच्या वैद्यकीय शिक्षण खात्याने घेतला असून त्यासाठी वैद्यकीय शिक्षण आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली पाचसदस्यीय समिती स्थापन केली आहे.

Slum Improvement Board, contract,
मुंबई : झोपडपट्टी सुधार मंडळातील ‘कंत्राटा’साठी गोळीबार!
Sales of e-vehicles pune
गडकरींनी वारंवार सांगूनही लोकांनी फिरवली पाठ! ई-वाहनांच्या विक्रीला गती मिळेना
Independent rehabilitation system for mentally ill patients Mumbai print news
मानसिक आजारमुक्त रुग्णांसाठी स्वतंत्र पुनर्वसन व्यवस्था!
byju s shuts 30 out of 292 tuition centres for cost cutting
बायजूच्या ३० शिकवणी केंद्रांना टाळे; खर्चात कपात करण्यासाठी कंपनीने उचलले पाऊल

त्यात विशेष पोलीस महानिरीक्षक (सायबर), मुंबई, विधि व न्याय विभागाचे उपसचिव, लेखा व कोषागारे (आरोग्य सेवा) विभागाचे सहसंचालक आणि वैद्यकीय शिक्षण विभागाचे सहसंचालक (दंत) आदींचा समावेश आहे. यासंदर्भात २९ जून रोजी वैद्यकीय शिक्षण विभागाने शासन निर्णय काढला आहे. ही समिती सध्याच्या कार्यपद्धतीचा अभ्यास करून शासनाला नियमावलीबाबत शिफारशी करणार आहे. समितीला दोन महिन्यांत अहवाल सादर करायचा आहे, असे शासन निर्णयात नमूद आहे.