नागपूरहून मुंबईला जाणाऱ्या इंडिगोच्या विमानाचा आपत्कालीन दरवाजा उघडण्याचा प्रयत्न प्रवाशाकडून करण्यात आला. विमानातील कर्मयाऱ्यांच्या लक्षात येताच ते थांबवण्यात आले. विमान मुंबई विमानतळावर उतरल्यानंतर संबंधित प्रवाशाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. इंडिगोचे विमान २४ जानेवारी रोजी सकाळी ११.५ वाजता मुंबईसाठी रवाना झाले होते. इंडिगो विमानात बसलेल्या प्रणय राऊतने दुपारी १२ वाजल्यानंतर विमानाचा आपत्कालीन दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा >>>बुलढाणा : कारचालकाचे नियंत्रण सुटले आणि भरधाव स्विफ्ट कार रस्त्यालगतच्या झाडावर आदळली, दोन युवक जागीच ठार

आपत्कालीन दरवाजा उघडण्याचे संकेत मिळताच कर्मचाऱ्याने त्याला तसे करण्यापासून रोखले आणि वैमानिकाला माहिती दिली.वैमानिकाने वरिष्ठांना माहिती दिली. विमान मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरल्यानंतर कर्मचाऱ्याने पोलिसात तक्रार दाखल केली. पोलिसांनी तपासानंतर आरोपी प्रणय राऊतला अटक केली.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: An attempt to open the emergency door of an indigo flight from nagpur to mumbai rbt 74 amy
First published on: 30-01-2023 at 17:08 IST