scorecardresearch

नागपूर: सोन्याचे बिस्कीट घेऊन ग्राहकाकडे गेलेला कर्मचारी पळाला

कौशल रजनीकांत मुनी (४१) रा. बेलतरोडी असे आरोपीचे नाव आहे.

employee working Karan Kothari Jewellers betrayed owner ran away gold biscuits Rs 57 lakh nagpur
सोन्याचे बिस्कीट घेऊन ग्राहकाकडे गेलेला कर्मचारी पळाला (छायाचित्र- लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

नागपूर: उपराजधानीतील करण कोठारी ज्वेलर्स प्रा. लि. मध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्याने मालकाचा विश्वासघात करत दुकानातून ग्राहकांना दाखवण्यासाठी नेलेले ५७ लाख रुपये किमतीची सोन्याची बिस्किटे व नाणे घेऊन पळ काढला.

कौशल रजनीकांत मुनी (४१) रा. बेलतरोडी असे आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी कौशलविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करत त्याला अटक केली आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, शंकरनगरमध्ये करण कोठारी ज्वेलर्स आहे. येथे ग्राहकांसाठी घरपोच सेवाही दिली जाते. त्यानुसार ग्राहकांना रिफाईंड गोल्ड बिस्कीट किंवा नाणे दाखवण्याकरिता दुकानातील कर्मचारी घरी जातात. कर्मचाऱ्यांच्या नावाने अगोदर चालान बनवण्यात येते व कर्मचारी ते सोने ग्राहकांना घरी जाऊन दाखवतात. जर ते सोने ग्राहकांना पसंत पडले तर कर्मचारी परत येऊन बिल बनवतात.

flood in nagpur due to dumping skating rink slab on Nag River
नदीवर पार्किंगसाठी ६० फूट स्लॅब टाकल्याने नागपुरात पूर,ॲक्वा पार्कसाठी नदीवर अतिक्रमण
tigress plays with a gum boot Tadoba
प्लास्टिक बंदी असलेल्या ताडोबा व्याघ्र प्रकल्पात वाघिणीचा गम बूटसोबत खेळ
MPSC Question paper was leak
ही तर हद्दच झाली! चक्क स्पाय कॅमेऱ्याचा वापर करुन ‘एमपीएससी’ची प्रश्नपत्रिका फोडली
Marathi Kranti Morcha Buldhana
मराठा आरक्षण क्रांती मोर्चा : बुलढाणा जिल्हा, आयोजकांसह इतर भागांतही उत्सुकता!

हेही वाचा… ग्रेट व्हाईट नागपुरात विद्युत साहित्य निर्मिती प्रकल्प उभारणार; ३०० कोटींची गुंतवणूक

ग्राहकांना जर दागिने पसंत पडले नाही तर परत सोने व चालान जमा करण्यात येते. या प्रक्रियेला १५ दिवस लागतात व त्यानंतर तपासणी होते. आरोपी कौशल रजनीकांत मुनी (४१) याने १८ ऑक्टोबर ते २५ ऑक्टोबर दरम्यान सहा चालान बनवले व ५७.६० लाखांची सोन्याची बिस्किटे व नाणे ग्राहकांना दाखवण्यासाठी घेऊन गेला. मात्र, त्यानंतर त्याने ते सोने दुकानात परत केले नाही व तो कामावरदेखील आला नाही. ही बाब समोर येताच त्याच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न झाला. मात्र, तो सापडला नाही. अखेर उपविक्री व्यवस्थापक कोशल व्यास यांनी त्याच्या विरोधात अंबाझरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्याला अटक केली आहे. या घटनेमुळे शहरातील इतरही सराफा व्यवसायिकांमध्ये दहशत पसरली आहे.

Latest Comment
View All Comments
Post Comment

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: An employee working at karan kothari jewellers betrayed the owner and ran away with gold biscuits worth rs 57 lakh in nagpur mnb 82 dvr

First published on: 21-11-2023 at 09:43 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×