scorecardresearch

Premium

‘ऑनलाइन जॉब’ : १० हजार कमावले, पण लगेच ९२ हजार गमावले

घरबसल्या ऑनलाइन काम करून पैसे कमविण्याच्या नादात अभियांत्रिकीच्या एका विद्यार्थ्याने १० हजार रुपये कमावले; मात्र त्याबदल्यात त्याची ९२ हजार ८०० रुपयांनी फसवणूक झाली.

engineering student cheated
'ऑनलाइन जॉब' : १० हजार कमावले, पण लगेच ९२ हजार गमावले (image – pixabay/representational image)

अमरावती : घरबसल्या ऑनलाइन काम करून पैसे कमविण्याच्या नादात अभियांत्रिकीच्या एका विद्यार्थ्याने १० हजार रुपये कमावले; मात्र त्याबदल्यात त्याची ९२ हजार ८०० रुपयांनी फसवणूक झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

अमित रावसाहेब शिरसाठ (२४) असे तक्रारकर्त्या युवकाचे नाव असून, तो मेकॅनिकल इंजिनिअरिंगचा विद्यार्थी आहे. गेल्‍या २५ ऑगस्ट रोजी त्याच्या भ्रमणध्वनीवर रोशनी शहा नामक एका युवतीकडून ऑनलाइन जॉब संदर्भात संदेश आला. घरबसल्या दोन ते तीन हजार रुपये कमाविण्याची संधी असल्याचे त्यात म्हटले होते. अमितने त्यासाठी होकार दिल्यावर त्याला भारती मिश्रा नावाच्‍या आयडीवर संपर्क करण्याचे सांगण्यात आले. त्यानंतर भारती मिश्राने अमितला एका व्‍हॉट्स अ‍ॅप समुहावर सहभागी करून घेतले. तिथे वेगवेगळे टास्क दिले जात होते. यूट्युबच्या काही चॅनलला सबस्क्राईब करून त्याचे स्क्रिनशॉट समुहावर टाकायचे आणि त्याबदल्यात अमितच्या खात्यात प्रत्येकी ५० रुपये जमा करण्यात येत होते. प्रत्येक टास्कसाठी काही रक्कम अमितलाही भरायची होती. प्रत्येकवेळी टास्कची रक्कम आणि त्याला मिळणाऱ्या मोबदल्याचीही रक्कम वाढत होती.

chakan police arrest five for threatening businessman for extortion of 1 crore
चाकण: एक कोटींच्या खंडणीसाठी व्यावसायिकाला जीवे मारण्याची धमकी; घरच्यांचा गेम करेल म्हणाऱ्या आरोपींना ठोकल्या बेड्या
28 year old woman who kidnapped 18 month child arrested within 12 hours
मुंबईः दीड वर्षाच्या मुलाचे अपहरण करणाऱ्या महिलेला १२ तासांत अटक; मुलाची सुखरूप सुटका
five decision of shinde fadnavis government taken back in one and a quarter years
उलटा चष्मा : मर्यादा २५ हजार करून टाका!
guruji foundation
गरजूंचे ‘गुरुजी’

हेही वाचा – अकोला : कर्णबधिरांच्या शिक्षणासाठी संवादात्मक शिक्षण अ‍ॅप

हेही वाचा – ‘सिंगल गर्ल चाईल्ड’साठी मिळणार शिष्यवृत्ती, काय आहे योजना? वाचा…

अमितच्या खात्यात जवळपास १० हजार रुपये जमा झाले. त्यानंतर ऑनलाइन चलन खरेदीसाठी पुन्हा खाते उघडायला सांगण्यात आले. अमितने ते खाते उघडल्यावर टप्‍प्याटप्‍प्याने त्याला ९२ हजार रुपये जमा करण्यास सांगण्यात आले. अमितनेही ती रक्कम भारती मिश्राने दिलेल्या खात्यात जमा केली. मात्र यादरम्यान आपली फसवणूक होत असल्याचे त्याच्या निदर्शनात आल्यामुळे त्याने सदर रक्कम परत मागितली त्यावेळी त्याची आयडी व ऑनलाइन खाते बंद करण्यात आले. त्यामुळे अमितच्या तक्रारीवरून गाडगेनगर पोलिसांनी सदर प्रकरणी गुन्हा दाखल केला.

Latest Comment
View All Comments
Post Comment

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: An engineering student was cheated of 92 thousand rupees mma 73 ssb

First published on: 24-09-2023 at 11:51 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×