scorecardresearch

वाशीम : अनंतराव देशमुख समर्थकांसह भाजपात; पुत्र ॲड. नकुल, चैतन्य यांचाही पक्षप्रवेश

काँग्रेसचे मातब्बर नेते माजी मंत्री अनंतराव देशमुख आपल्या समर्थकांसह काल, मंगळवारी भाजपात दाखल झाले. त्यांचे पुत्र ॲड. नकुल आणि चैतन्य देशमुख यांनीही भाजपात प्रवेश केला.

Anantrao Deshmukh joined BJP
अनंतराव देशमुख समर्थकांसह भाजपात; पुत्र ॲड. नकुल, चैतन्य यांचाही पक्षप्रवेश (छायाचित्र – लोकसत्ता टीम)

वाशीम : जिल्ह्यातील काँग्रेसचे मातब्बर नेते माजी मंत्री अनंतराव देशमुख आपल्या समर्थकांसह काल, मंगळवारी भाजपात दाखल झाले. त्यांचे पुत्र ॲड. नकुल आणि चैतन्य देशमुख यांनीही भाजपात प्रवेश केला.

हेही वाचा – नागपूर : सीबीआयने केली सहायक कामगार आयुक्ताला लाच घेताना अटक

हेही वाचा – एका प्रदेशाध्यक्षाला यशाने तारले, दुसऱ्यापुढे कर्तृत्वसिद्धतेचे आव्हान

मुंबईत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, मंत्री गिरीश महाजन, भाजपचे राज्य महासचिव आमदार रणधीर सावरकर, आमदार लखन मलिक, माजी आमदार विजयराव जाधव यांच्या उपस्थितीत त्यांनी भाजपात प्रवेश केला. यावेळी उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, अनंतराव देशमुख यांनी भाजपामध्ये यावे, यासाठी बरेच प्रयत्न करण्यात आले. देशमुख यांच्या अनुभव आणि कर्तृत्वाचा भाजपाला नक्कीच फायदा होईल. त्यांनी अनेक वर्षे काँग्रेसमध्ये काम केले, परंतु त्यांच्या पदरी निराशाच आली. भाजपामध्ये मात्र त्यांना निराश होऊ देणार नाही. त्यांच्या कामास प्राधान्य दिले जाईल. यावेळी जिल्ह्यातील भाजपाचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मराठीतील सर्व नागपूर / विदर्भ ( Nagpur ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 15-03-2023 at 09:14 IST
ताज्या बातम्या