नागपूर:   प्राप्तीकर विभागाने  १७ सप्टेंबरला माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या  नागपुरातील निवासस्थानी व त्यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या संस्थांवर  छापे टाकले होते. या  कारवाई दरम्यान महत्त्वाची कागदपत्रे सापडल्याचे स्पष्ट केले आहे. शोध मोहिमेदरम्यान सापडलेल्या पुराव्यांवरून स्पष्ट होते की सुमारे  १७ कोटी रुपयांचे उत्पन्न दडवण्यात आल्याचे नमुद केले आहे

प्राप्तीकर विभागाने  नागपूर, मुंबई, नवी दिल्ली आणि कोलकातामध्ये ३० ठिकाणी शोध आणि सर्वेक्षण केले होते. या कारवाई  दरम्यान, अनेक कागदपत्रे आणि इतर पुरावे सापडले.  या समूहाकडून चालवण्यात येत असलेल्या ट्रस्टला  दिल्लीतील कंपन्यांकडून  ४ कोटी रुपये बनावट देणगी मिळाल्याचा पुरावा सापडला आहे.  ट्रस्टच्या तीन शैक्षणिक संस्था वाढीव खर्चात सहभागी असल्याचे पुरावे सापडले आहेत. यामध्ये  कर्मचाऱ्यांना दिले जाणारे वेतन अंशत: रोख स्वरूपात पुन्हा परत घेतले होते. असे अनेक  पुरावे सापडले असून ही रक्कम  १२ कोटींपेक्षा जास्त आहे.   याशिवाय ट्रस्टने पावत्या दडपण्याव्यतिरिक्त प्रवेशाची व्यवस्था करण्यासाठी दलालांना मोठी  रक्कम दिली आहे. ती सुमारे ८७ लाख रुपये असून ती  पूर्णपणे बेहिशेबी आहे.