राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी ईडी प्रकरणात जामीन प्राप्त झाल्यावर विविध प्रश्नांवर राज्य सरकारकडे पत्र व्यवहार करणे सुरू केले आहे. आता त्यांनी केंद्रीय वाणिज्य मंत्री पीयूष गोयल यांना पत्र लिहून कापूस उत्पादना न्याय देण्याची विनंती केली आहे.सध्या राज्यात कापसाला प्रती क्विंटल८ हजार ३०० ते ८ हजार ५०० रुपये भाव मिळत आहे, त्यातून उत्पादन खर्च सुध्दा निघत नसल्याने शेतकऱ्यांनी कापूस बाजारात विक्रीसाठी नेला नाही. महाराष्ट्रातील कापूस उत्पादकांना दिसाला देण्यासाठी केंद्राने कापसाच्या हमी भावात वाढ करावी, अशी मागणी देशमुख यांनी पीयूष गोयल यांच्याकडे केली आहे.
हेही वाचा >>>उद्या मतदान अन् भाजपचे आमदार समीर कुणावार ‘अदृश्य’!, भाजप समर्थित नागो गाणार गटाला हादरा
या पूर्वी अनिल देशमुख यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विकास कामांवरील स्थगिती उठवण्यात यावी अशी मागणी केली होती. तसेच काटोल मधील दिवाणी न्यायालयाच्या मागणी कडे लक्ष वेधले होते. देशमुख यांना न्यायालयाने जामीन मंजूर केला असला तरी त्यांना मुंबई बाहेर जाण्यास मनाई केली आहे हे येथे उल्लेखनीय.