इंदामर एव्हिएशनचे ‘एमआरओ’ सुरू

नागपूर : मिहानमध्ये इंदामर एव्हिएशनने प्रवासी विमान देखभाल-दुरुस्ती दुरुस्ती केंद्रातून (एमआरओ) सेवा देणे सुरू केले आहे. त्यामुळे येथे एअर इंडिया आणि इंदामर असे दोन एमआरओ सुरू झाले आहेत.

तीन दिवसांपूर्वी इंदामर एव्हिएशन प्रा. लि.ने त्यांचा एमआरओ संचालित केला आहे. मिहान-सेझमध्ये २४ एकरमध्ये त्यांचा प्रकल्प असून स्पाईजसेट विमानाच्या देखभाल-दुरुस्तीने या कामास प्रारंभ करण्यात आला. अमेरिकन कंपनी एएआर आणि इंदामर  टेक्निस या कंपनीचा नागपुरातील हा संयुक्त उपक्रम आहे. इंदामर कंपनीने विदेशी एअरलाईन्सच्या विमानांच्या देखभाल दुरुस्तीची परवानगी मिळावी म्हणून अर्ज देखील केला आहे. मिहानमध्ये एअर इंडियाचे विमान देखभाल दुरुस्ती केंद्र (एमआरओ) आहे. याला लागूनच इंदामरचा एमआरओ आहे. भारताने बोईंग प्रवासी विमान खरेदी केले. त्यावेळी झालेल्या करारानुसार बोईंगने भारतात एमआरओ उभारले आणि एअर इंडियाला हस्तांतरित केले.