लोकसत्ता टीम
बुलढाणा: विदर्भाची भाग्यरेखा ठरण्याऐवजी काळ रेखा ठरलेल्या समृद्धी महामार्गावर आज रविवारी सकाळी झालेल्या भीषण अपघातात सहा प्रवासी ठार तर तिघेजण गंभीर जखमी झाले. भरधाव वेगात असलेले चारचाकी वाहन( कार) कठड्यावर आदळून झालेल्या या अपघातात २ लहान मुलांसह चार महिलांचा मृत्यू झाला.
आणखी वाचा- महाराष्ट्र, मध्यप्रदेशात वाळू तस्करांचे तर गुजरातमध्ये दारू माफियांचे सरकार: नाना पटोले
आज, १२ मार्च रोजी सकाळी समृद्धी महामार्गावर सिंदखेडराजा ते मेहकरदरम्यान ही दुर्घटना घडली. औरंगाबाद येथून शेगावकडे ( जि. बुलढाणा) जाणाऱ्या अर्टीगा कारमध्ये ९ प्रवासी होते. शिवणीपिसा, खळेगाव परिसरात कठड्याला भरवेगात वाहन धडकले. यामुळे वाहनाचा जवळपास चुराडा झाल्याचे वृत्त आहे. यात दोन लहान मुलांसह चार महिलांचा मृत्यू झाला. तिघेजण गंभीर जखमी असून त्यांना मेहकर येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले.
