लोकसत्ता टीम

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

चंद्रपूर : आम्ही धर्मांतर खपवून घेणार नाही. त्यामुळे महाराष्ट्रात लवकरच धर्मांतर विरोधी कायदा आणू, बांगलादेशी व रोहिंग्याचा शोध घेऊन त्यांना परत पाठवू, हिरवा रंग धारण करणाऱ्यां सापानी वळवळ थांबवावी, गो हत्या बंद करा, अन्यथा आम्हाला प्रत्येक वॉर्डातील वराह जयंती साजरी करावी लागेल. त्यासाठी आम्हाला सरकारची परवानगी घ्यावी लागणार नाही. राज्यात हिंदूचे सरकार आहे. सरकार घरी येऊन परवानगी देईल, असा इशारा मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी दिला.

गांधी चौक येथे आयोजित हिंदू धर्म सभा मध्ये ते बोलत होते. मंचावर मुरलीधर महाराज होते. याप्रसंगी.राणे यांनी अतिशय कडवट भाषेत बोलताना टीकास्त्र सोडले, राज्यात सर्वत्र हिरव्या सापांची वळवळ सुरू आहे. लव जिहाद प्रकरणातून हिंदू मुलींची फसवणूक सुरू आहे. त्यामुळे वेळेत वळवळ कमी झाली नाही तर प्रत्येकाला आतमध्ये टाकू हे सांगण्यासाठी मी चंद्रपुरात आलो आहे असेही राणे म्हणाले. आम्ही सर्व हिंदू विचाराचे लोक आहोत. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कडवट हिंदू मुख्यमंत्री म्हणून सरकारचे नेतृत्व करीत आहेत. तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे प्रतिनिधी म्हणून राज्य सरकारमध्ये आहेत.

सरकारमध्ये असल्यामुळे सर्व यंत्रणा आमच्या हातात आहे. कोण कुणाची अवेळी बिर्याणी खात आहे. कोण कुणाची दाडी कुरवाळत आहे हे आम्हाला माहीत आहे. आम्ही त्याचा वेळीच कार्यक्रम करू असाही इशारा दिला. हिंदू समाजाच्या विरोधात भूमिका घेतली तर जागा दाखवू. तेव्हा तुमचा पाकिस्तान मध्ये बसलेला अब्बा काही करू शकणार नाही. हिंदू समाजातील मुलीचे आयुष्य जिहादी उद्ध्वस्त करीत आहेत. हिंदू समाजाकडे वाकड्या नजरेने बघणाऱ्या स्थान नाही, हिंदू समाजाचे बाप सरकार मध्ये आहे. उगाच वळवळ राज्यात करायची नाही अन्यथा गाठ माझ्याशी आहे. धर्मांतर खापवून घेणार नाही. राज्यात सर्वात कडक धर्मांतर विरोधी कायदा लवकरच आणू. महविकास आघाडी सरकारच्या काळात हे सर्व चालले. आता चालणार नाही. चंद्रपूर जिल्ह्यात लव जिहादचे २२ प्रकरण आहेत. मोहम्मद पैगंबर यांना मानणारा मुस्लिम समाज पीरबाबांना मानत नाही असेही राणे म्हणाले.

हिंदू राष्ट्रात पाहिले हिंदूचे हित बघितले व जोपासले जाईल, मग इतरांना बघणार आहे. वणी, पांढरकवडा येथे मोठ्या प्रमाणात गो हत्या सुरू आहेत. गो वंश कायद्याची शंभर टक्के अंबलबाजावणी झालीच पाहिजे ही स्पष्ट भूमिका आहे. येथे शरिया कायदा लागू नाही. तो पाकिस्तान मध्ये लागू आहे. गाईच्या कत्तली खपवून घेणार नाही. गाय ही आपली आई आहे. तेव्हा कायद्याचे पालन करा, हा प्रकार खपवून घेणार नाही. हिरवे साप राज्यपाला पेक्षा मोठे झाले आहे का? हिंदू धर्माकडे वाकड्या नजरेने बघत असाल तर खेर नाही. गो हत्येच्या नावाने मस्ती सुरू आहे ती बंद करा असेही राणे म्हणाले.

राज्यात सरकार आणण्यासाठी हिंदू पाठीशी राहिला. त्यामुळे हिंदू समाजासाठी काम करणार आहे. रोहण्यांना राज्याच्या बाहेर काढण्याचे काम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस करीत आहे. तेव्हा तुम्ही बॅग भरा आणि पाकिस्तानात चालते व्हा असेही राणे म्हणाले. शाहरुख खान व सलमान खान आमच्या हिंदू बहिणीकडे वाकड्या नजरेने बघत असेल तर माझ्याकडे या. त्यांची नावे द्या त्यांचा तिथेच बंदोबस्त व कार्यक्रम करू असेही राणे म्हणाले. तिरंगा झेंडा मंत्रालयात फडकातो आहे. मात्र त्यापेक्षाही मोठा भगवा झेंडा मंत्रालयावर फडकतो आहे हे लक्षात ठेवा. मी मंत्री म्हणून नाही तर हिंदू म्हणून तुमच्याशी संवाद साधायला आलो आहे असेही राणे म्हणाले.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Anti conversion law soon in maharashtra and bangladeshis rohingyas will be sent back says nitesh rane rsj 74 mrj