scorecardresearch

Premium

गडचिरोली : “हिंदुत्ववादी विचारसरणीविरुद्ध जनयुद्ध उभारा”, भामरागड तालुक्यात नक्षलवाद्यांचे फलकाद्वारे आवाहन

भामरागड तालुक्यातील अतिदुर्गम धोडराज ठाण्याच्या हद्दीतील हिंदेवाडा येथे मुख्य रस्त्यावर नक्षलवाद्यांनी लाल रंगाचे फलक लावून हिंदुत्वववादी विचारसरणीविरुद्ध जनयुद्ध उभारण्याचे आव्हान केले आहे.

Naxalites banner Bhamragad taluka
गडचिरोली : “हिंदुत्ववादी विचारसरणीविरुद्ध जनयुद्ध उभारा”, भामरागड तालुक्यात नक्षलवाद्यांचे फलकाद्वारे आवाहन (image credit – loksatta team/indian express/loksatta graphics )

गडचिरोली : नक्षलवादी संघटनेच्या १९ व्या वर्धापनदिनानिमित्त २१ सप्टेंबरपासून सप्ताहाला सुरुवात झाली. पहिल्याच दिवशी भामरागड तालुक्यातील अतिदुर्गम धोडराज ठाण्याच्या हद्दीतील हिंदेवाडा येथे मुख्य रस्त्यावर नक्षलवाद्यांनी लाल रंगाचे फलक लावून हिंदुत्वववादी विचारसरणीविरुद्ध जनयुद्ध उभारण्याचे आव्हान केले आहे. दरम्यान, पोलिसांनी हे पोस्टर काढले असून तपास सुरु केला आहे.

नक्षलवादी संघटनेच्या १९ वा वर्धापनदिनानिमित्त केंद्रीय समितीने ऑगस्टमध्ये २८ पानांचे पत्रक काढून थेट भाजपला इशारा दिला होता. वर्धापनदिनानिमित्त २१ ते २७ सप्टेंबर २०२३ दरम्यान सप्ताह साजरा करण्याचे आवाहन केले होते. दरम्यान, सप्ताहाच्या पहिल्याच दिवशी २१ सप्टेंबरला भामरागड तालुक्यातील हिंदेवाडा फाट्यावरील रस्त्यावर दोन झाडांना नक्षल्यांनी फलक लावले. त्यात संघटनेच्या वर्धापनदिनानिमित्त नक्षल सप्ताह उत्साहात व दृढ संकल्पासह साजरा करण्याचे आवाहन केले आहे.

shree kopineshwar temple thane, thane district collector, thane municipal commissioner
ठाण्याच्या ऐतिहासिक कौपीनेश्वर मंदिराचा जीर्णोद्धार की दुरुस्ती? महापालिका आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांनी केली मंदिराची पाहणी
Chandrashekhar Bawankule symbolic statue burn
बुलढाणा : ढाब्याऐवजी पत्रकार उतरले रस्त्यावर! बावनकुळेंच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन
explosives buried by Naxalites Gadchiroli
गडचिरोली पोलिसांनी घातपाताचा डाव उधळला, नक्षल्यांनी पुरून ठेवलेली स्फोटके जप्त
Chandrapur Ganapati immersion
चंद्रपूर : मुस्लीम बांधवांच्या ‘या’ निर्णयाचे कौतुक, गणपती विसर्जन आणि ईद-ए-मिलाद…

हेही वाचा – सरकारी शाळांचे कंपनीकरण थांबवा; प्राथमिक शिक्षक समितीने दर्शविला विरोध

ब्राम्हणीय हिंदुत्ववादाविरुद्ध लढा देण्यासाठी व्यापक जनयुद्धाची हाक दिली आहे. संघटना अधिक मजबूत करण्याचे आवाहनदेखील करण्यात आले आहे. यात केंद्रीय कमिटी भारत की कम्युनिस्ट पार्टी (माओवादी) असा उल्लेख आहे. दरम्यान, परिसरात खळबळ उडाली. माहिती मिळताच पोलिसांनी तेथे धाव घेत फलक ताब्यात घेतले आहे.

हेही वाचा – चंद्रपुरात मुसळधार, अनेक भागांत पाणी शिरले; साचलेल्या पाण्यामुळे रस्त्यांना जलतरण तलावाचे स्वरूप

‘सी – ६०’चे जवान तळ ठोकून

धोडराज हद्दीतील हिंदेवाडा फाटा रस्त्यावर नक्षल फलक आढळले आहे. ते ताब्यात घेतले असून तपास सुरू केला आहे. नक्षलविरोधी अभियान राबविले जात आहे. त्या भागात पोलीस अधिक अलर्ट आहेत, सी- ६० चे जवान तळ ठोकून आहेत, अशी माहिती गडचिरोलीचे पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांनी दिली.

Latest Comment
View All Comments
Post Comment

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Appeal of naxalites through banner in bhamragad taluka ssp 89 ssb

First published on: 21-09-2023 at 14:29 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×