नागपूर : पंतप्रधान श्रमयोगी मानधन योजनेत सहभागी होण्यासाठी कामगारांनी सेवा केंद्रात नाव नोंदणी करावी. महापालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती व विविध विभागांशी संलग्न काम करणाऱ्या कामगारांना या योजनेत सहभागी करण्यासाठी संबंधित विभागांनी पुढाकार घ्यावा, अशा सूचना जिल्हाधिकारी विमला आर. यांनी दिल्या.

या योजनेसाठी १८ ते ४० वर्षे वयोगटातील कामगार पात्र असून सीएससी सेवा केंद्रात त्यांनी नोंदणी करावी. योजनेची माहिती ग्रामपंचायतपर्यंत पोहोचवण्यासाठी व्यापक मोहीम राबवून जिल्ह्य़ातील अंगणवाडी सेविका, महिला बचत गट सदस्या तसेच स्थानिक स्वराज्य संस्था व शासनाच्या विविध संस्थांमध्ये काम करणाऱ्या कंत्राटदारांकडील कामगारांना प्राधान्याने या योजनेत समाविष्ट करण्यासाठी प्रयत्न करावे, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले.

Dispute over seat allocation in Mahavikas Aghadi
महाविकास आघाडीत जागावाटपावरून रुसवेफुगवे
Trinamool Congress MPs protesting in front of the Central Election Commission headquarters protested at the police station
तृणमूलचे ‘राजकीय नाटय़’; केंद्रीय तपास यंत्रणांविरोधात पोलीस ठाण्यात २४ तास ठिय्या आंदोलन
rbi should give top priority to development says pm narendra modi
विकासाला रिझर्व्ह बँकेने सर्वोच्च प्राधान्य द्यावे; व्याजदर कपातीसारख्या उपायांवर लक्ष देण्याची पंतप्रधानांची हाक 
Sanjay Mandlik
नरेंद्र मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी संजय मंडलिक यांना खासदार करूया; हसन मुश्रीफ यांचे आवाहन

विविध क्षेत्रातील असंघटित कामगारांना वयाच्या ६० वर्षांनंतर निवृत्तीवेतन देण्यासाठी ही योजना राबवण्यात येत असून वयाची ६० वर्षे पूर्ण झाल्यानंतर नोंदणीकृत लाभार्थी मासिक ३ हजार रुपये निवृत्ती वेतनास पात्र ठरतात. या योजनेत असंघटित क्षेत्रातील कामगार अनुक्रमे घरकाम करणारे कामगार, विटभट्टी कामगार, आशा वर्कर्स, अंगणवाडी सेविका, फेरीवाले, रिक्षाचालक, शेतमजूर, मनरेगा मजूर, मासेमारी करणारे, इमारत व इतर बांधकाम कामगार, मध्यान्ह भोजन वर्कर्स, नाका कामगार आदी व्यवसायात काम करणाऱ्यांचा यात समावेश आहे.