scorecardresearch

नागपूर : विधान परिषद निवडणूक, सर्व २७ उमेदवारांचे अर्ज वैध

विधानपिरषदेच्या नागपूर शिक्षक मतदारसंघ निवडणुकीसाठी प्राप्त नामनिर्देशनपत्रांची शुक्रवारी छाननी करण्यात आली.

नागपूर : विधान परिषद निवडणूक, सर्व २७ उमेदवारांचे अर्ज वैध
विधान परिषद निवडणूक, सर्व २७ उमेदवारांचे अर्ज वैध (छायाचित्र लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

नागपूर: विधानपिरषदेच्या नागपूर शिक्षक मतदारसंघ निवडणुकीसाठी प्राप्त नामनिर्देशनपत्रांची शुक्रवारी छाननी करण्यात आली. त्यात सर्व २७ उमेदवाराचे अर्ज वैध ठरले आहेत. १६ जानेवारीला अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस आहे.

विभागातील नागपूर, वर्धा, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया आणि गडचिरोली या सहा जिल्ह्यांमधून एकूण २७ उमेदवारांनी ४३ नामनिर्देशपत्र दाखल केले होते. विभागीय आयुक्त कार्यालयात निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. विजयलक्ष्मी बिदरी आणि निवडणूक निरीक्षक अरुण उन्हाळे यांच्या उपस्थितीत अर्ज छाननीची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली.

हेही वाचा >>> अमरावती : कृषी महोत्‍सव उधळण्‍यासाठी महाविकास आघाडीच्‍या नेत्‍यांचा दबाव, रवी राणा यांचा आरोप

यावेळी उमेदवार व त्यांचे प्रतिनिधीही उपस्थित होते. छाननीत सर्वच उमेदवार वैध ठरले आहेत. गडचिरोली जिल्ह्यात नागपूर विभाग शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीसाठी मतदानाच्यावेळेत बदल करण्यात आला आहे. यानुसार जिल्ह्यात ३० जानेवारीला सकाळी ७ ते दुपारी ३ वाजेपर्यंत मतदान होईल.

मराठीतील सर्व नागपूर / विदर्भ ( Nagpur ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 13-01-2023 at 18:01 IST

संबंधित बातम्या