राज्यस्तरीय न्यायालयीन प्रकरणे, करोना टाळेबंदी व विविध कारणामुळे प्रलंबित असलेल्या चंद्रपूर जिल्ह्यातील १२ कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या निवडणुकीचा बिगुल अखेर वाजला. याबाबत राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाचा आदेश मंगळवारी २१ मार्चला जिल्हा उपनिबंधक कार्यालयाला धडकला आहे. ही निवडणूक २८ एप्रिलला होणार असून, यंदा सहकार संस्थांसह सरपंच व सदस्यांनाही मतदानाचा हक्क बजावण्याची संधी मिळणार आहे. बाजार समित्या आपल्याच ताब्यात राहाव्या यासाठी राजकीय पक्षानी मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा >>>सात महिन्यांच्या बंदीवासानंतर चित्त्यांनी ठोकली धूम! नामिबियातील चित्ते अखेर कुनोच्या खुल्या जंगलात

चंद्रपूर जिल्ह्यातील सहकार क्षेत्राची व्याप्ती मोठी नसली तरी त्यामध्ये कृषी उत्पन्न बाजार समित्यांची भूमिका प्रभावशाली आहे. मूल, चंद्रपूर, भद्रावती, राजुरा, वरोरा, गोंडपिपरी, सावली, ब्रह्मपुरी, सिंदेवाही व नागभीड बाजार कोट्यवधींची उलाढाल होते. त्यामुळे बाजार समित्यांमध्ये वर्चस्व राहावे यासाठी सर्चच राजकीय पक्षाचे नेते मोर्चेबांधणी करीत आहे. यंदा तर बाजार समित्यांच्या निवडणुकीत मतदार म्हणून सरपंच व मंगळवारी सदस्यांनाही संधी मिळणार असल्याने ग्रामीण भागातील राजकीय वातावरण ढवळून निघणार आहे.

हेही वाचा >>>“काँग्रेसची विचारसरणी आदर्श, मात्र नेते नालायक”, माजी आमदार अशोक शिंदेंनी संताप व्यक्त करीत काँग्रेसला ठोकला रामराम

बाजार समित्यांची मुदत संपूनही निवडणुका न झाल्याने १२ बाजार समित्यांवर प्रशासक राज सुरू आहे. मंगळवारी राज्य सरकार निवडणूक प्राधिकरणाचे सचिव डॉ. पी.एल. खंडागळे यांनी निवडणूक कार्यक्रमाचा आदेश जारी केला. त्यानुसार जिल्हा उपनिबंधक प्रशासकीय कार्यवाही पूर्ण करून या आदेशाला अनुसरून स्थानिक स्थितीप्रमाणे जिल्ह्याचा निवडणूक कार्यक्रम अंतिम मंजुरीनंतर जाहीर करणार आहेत. मतदारांचे सहकारी, माथाडी, हमाल, अशाप्रकारचे वेगवेगळे संवर्ग आहेत. त्यात आता सरपंच व ग्रामपंचायत सदस्यांचीही भर पडली. चंद्रपूर जिल्ह्यात २६ मार्चला काही सेवा सहकारी संस्थांच्या निवडणुका आहेत. ही निवडणूक आटोपल्यानंतर मतदाराची पुरवणी यादी तयार करून अंतिम यादी प्रकाशित केली जाणार असल्याचे समजते. निवडणुका दोन टप्प्यांतही होऊ शकतात.

हेही वाचा >>>गडचिरोली: नक्षलवाद्यांचा घातपाताचा डाव उधळला; पुरुन ठेवलेली शक्तीशाली स्फोटके जप्त

असा असेल निवडणूक कार्यक्रम

नामनिर्देशन दाखल २७ मार्च ते ३ एप्रिल २०२३, नामनिर्देशन अजांची छाननी ५ एप्रिल २०२३, नामनिर्देशन मागे घेणे ६ ते २० एप्रिल, उमेदवारांची अंतिम यादी प्रसिद्ध व चिन्ह वाटप २१ एप्रिल, मतदान २८ एप्रिल २०२३ तर मतमोजणी मतदान दिनांकापासून तीन दिवसांच्या आत होणार आहे.

या बाजार समित्यांसाठी निवडणुका

चंद्रपूर, मूल, ब्रह्मपुरी, भद्रावती, राजुरा, कोरपना, पोंभुर्णा, गोंडपिपरी, नागभीड, सिंदेवाही, चिमूर, वरोरा येथील बाजार समितीमध्ये निवडणूक होईल.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: April 28 election of agricultural produce market committees rsj 74 amy
First published on: 23-03-2023 at 16:55 IST