scorecardresearch

नागपूर: महाराष्ट्र सुरक्षा दलाचे जवान आणि चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांमध्ये जुंपली !

चतुर्थ श्रेणी कर्मचारी संपावर

नागपूर: महाराष्ट्र सुरक्षा दलाचे जवान आणि चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांमध्ये जुंपली !
महाराष्ट्र सुरक्षा दलाचे जवान आणि चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांमध्ये जुंपली

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेडिकल) येथे मंगळवारी सकाळी साडेदहा वाजता स्वच्छता कर्मचारी आणि महाराष्ट्र सुरक्षा दलाच्या जवान यांच्यात शाब्दिक वाद झाला. त्यामुळे चतुर्थ कर्मचारी संपावर गेल्याने प्रशासनात खळबळ उडाली.मेडिकल रूग्णालयातील अतिदक्षता विभागाच्या परिसरात एक चतुर्थ श्रेणी कर्मचारी स्वच्छता करीत होता. तेथे रुग्णांच्या नातेवाईकांची गर्दी होती. कर्मचाऱ्याने महाराष्ट्र सुरक्षा दलाच्या जवानाला गर्दी हटवण्याची विनंती केली. त्यावर जवानाने हे माझे काम नाही, माझी सेवा दुसऱ्या ठिकाणी असल्याचे प्रत्युत्तर दिले. चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांनीही जवानाला हे तुमच्याच काम असल्याचे सांगितले. या विषयावरून दोघांमध्ये शाब्दिक वाद झाला. तणाव निर्माण झाला. त्यानंतर जमलेल्या चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांनी जवानाने आमचा अपमान केल्याचे सांगत अचानक कामबंद केले.

हेही वाचा >>>चंद्रपूर: अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळेच पादचारी पूल कोसळला!; दोन अधिकारी निलंबित

त्यानंतर दोघांची मेडिकलचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. शरद कुचेवार यांचे कार्यालय गाठले. येथे दोन्ही गटाची समजूत काढण्याचा प्रयत्न सुरू झाले. दोघांनीही परस्परांची माफीही मागितली. परंतु तोडगा निघाला नाही. दोन्ही गट अधिष्ठाता कार्यालय परिसरात जमले. अधिष्ठाता डॉ. राज गजभिये यांनी शेवटी मध्यस्थी करून दोन्ही गटाची समजूत काढल्याने कर्मचारी साडेबारा दरम्यान कामावर परतले. त्यामुळे अधिकाऱ्यांनी सुटकेचा श्वास घेतला.

मराठीतील सर्व नागपूर / विदर्भ ( Nagpur ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 29-11-2022 at 15:07 IST

संबंधित बातम्या