scorecardresearch

Premium

बुलढाणा : बोरी अडगाव येथे सशस्त्र दरोडा! चोरट्यांच्या हल्ल्यात महिलांसह चौघे जखमी

खामगाव तालुक्यातील बोरी अडगाव नजीकच्या शेतात राहणाऱ्या शेतकऱ्याच्या घरी आठ ते दहाजणांनी सशस्त्र दरोडा टाकल्याची घटना मंगळवारी मध्यरात्रीच्या सुमारास घडली.

Armed robbery at Bori Adgaon
बुलढाणा : बोरी अडगाव येथे सशस्त्र दरोडा! चोरट्यांच्या हल्ल्यात महिलांसह चौघे जखमी (छायाचित्र – लोकसत्ता टीम)

बुलढाणा : खामगाव तालुक्यातील बोरी अडगाव नजीकच्या शेतात राहणाऱ्या शेतकऱ्याच्या घरी आठ ते दहाजणांनी सशस्त्र दरोडा टाकल्याची घटना मंगळवारी मध्यरात्रीच्या सुमारास घडली. यावेळी यामध्ये चोरट्यांनी लाठ्या, लोखंडी पाईप आणि चाकूने वार केल्याने महिलांसह चौघेजण जखमी झाले. लाखाचा ऐवज घेऊन आरोपी पसार झाले. जखमींवर खामगाव उप जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहे.

हेही वाचा – अभियांत्रिकी, औषधनिर्माण महाविद्यालयांतील प्राध्यापकांची १०५ पदांची निर्मिती, पात्रताधारकांसाठी आनंदवार्ता

three people injured in leopard attack
नायगाव शिवारात बिबट्याच्या हल्ल्यात तीन जण जखमी
twelve and a half foot giant python found in in chirner create panic among
अबब, चिरनेर मध्ये साडेबारा फुटी अजगर; भल्यामोठ्या अजगरामुळे नागरिकांमध्ये घबराहट
Leopards in Dighati Chirner forest on Uran Panvel border
उरण – पनवेल सीमेवरील दिघाटी – चिरनेर जंगलात बिबट्या ? रहिवाशांची धास्ती वाढली
explosives buried by Naxalites Gadchiroli
गडचिरोली पोलिसांनी घातपाताचा डाव उधळला, नक्षल्यांनी पुरून ठेवलेली स्फोटके जप्त

गौरव मारुती तायडे कुटुंबासह बाळापूर मार्गावर गावापासून दोन किलोमिटर अंतरावर शेतामध्ये राहतात. मध्यरात्रीच्या आसपास आठ ते दहा चोरट्यांनी हातामध्ये काठ्या, चाकू व इतर साहित्य घेऊन घरामध्ये प्रवेश केला. तसेच समोर आला त्याला मारहाण केली. गौरव आणि त्याच्या भावाने विरोध केला असता चोरट्याने दोघांसह घरातील महिलांनाही मारहाण केली. रोख रक्कम व गळ्यातील सोन्याची पोत हिसकावून एक लाख रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला . खामगाव ग्रामीण पोलिसांनी रात्रीच घटनास्थळी दाखल होत तपास सुरू केला. वरिष्ठांनी पाहणी केली. या घटनेमुळे खामगाव परिसरामधील शेतकऱ्यांत भीती निर्माण झाली आहे.

Latest Comment
View All Comments
Post Comment

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Armed robbery at bori adgaon four injured including women in thieves attack scm 61 ssb

First published on: 31-05-2023 at 11:32 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×