army officer posted at india china border died of cardiac arrest zws 70 | Loksatta

भारत-चीन सीमेवर तैनात वणीतील लष्करी अधिकाऱ्याचा हृदयविकाराने मृत्यू

ले. कर्नल वासुदेव दामोदर आवारी हे १७० फिल्ड रेजिमेंट वीर राजपूरमध्ये कर्तव्यावर होते

भारत-चीन सीमेवर तैनात वणीतील लष्करी अधिकाऱ्याचा हृदयविकाराने मृत्यू
लेफ्टनंट कर्नल वासुदेव दामोदर आवारी

यवतमाळ : वणी तालुक्यातील मुर्धोनी येथील मूळ निवासी लेफ्टनंट कर्नल वासुदेव दामोदर आवारी (३५) यांचा भारत-चीन सीमेवर अरुणाचल प्रदेशात कर्तव्य बजावत असताना हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू झाला.

ले. कर्नल वासुदेव आवारी यांचे पार्थिव आज गुरुवारी लष्कराच्या विशेष विमानाने नागपूर येथे आणण्यात आले. विमानतळावरच कामठी मिलिट्री बेसतर्फे त्यांना मानवंदना दिली गेली. त्यानंतर लष्करी वाहनाने त्यांचे पार्थिव रात्री वणी येथे आणण्यात आले. उद्या, शुक्रवारी ७ ऑक्टोबर रोजी सकाळी १०.३० वाजता त्यांचे मूळ गाव मुर्धोनी येथील सामुदायिक प्रांगणात त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.

ले. कर्नल वासुदेव दामोदर आवारी हे १७० फिल्ड रेजिमेंट वीर राजपूरमध्ये कर्तव्यावर होते. नुकतीच त्यांना मेजर पदावरून लेफ्टनंट कर्नलपदी पदोन्नती मिळाली होती. अरुणाचल प्रदेशातील भारत-चीन सीमेवर समुद्रसपाटीपासून १६ हजार फूट उंचीवर कर्तव्य बजावत असताना मंगळवारी ४ ऑक्टोबरला त्यांना श्वास घ्यायला त्रास होऊ लागला. सहकाऱ्यांनी त्यांना तत्काळ गुवाहाटीतील मिल्ट्री रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

वणीतील सुप्रसिद्ध कीर्तनकार डॉ. दामोदर आवारी यांचे वासुदेव हे धाकटे पुत्र होते. त्यांचे शालेय शिक्षण वणी येथील विवेकानंद विद्यालयात झाले. त्यांनी एनडीएमध्ये प्रवेश घेतला. त्यानंतर ते भारतीय सेनेत मेजर या पदावर रूजू झाले होते. सैन्यदलात अधिकारी असले तरी वणी तालुक्याशी त्यांची नाळ जुळली होती. परिसरातील तरुणांना ते कायम एनडीए, सैन्य भरती, पोलीस भरतीसंदर्भात मार्गदर्शन करायचे. येत्या दिवाळीत ते वणी व मुर्धोनीत येणार होते. मात्र, त्यापूर्वीच देशसेवा करत असलेल्या या सुपुत्राच्या अनपेक्षितपणे झालेल्या निधनाने मुर्धोनीसह वणी शहरात शोक व्यक्त होत आहे.

मराठीतील सर्व नागपूर / विदर्भ ( Nagpur ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
RSS च्या मुख्यालयावर मोर्चा काढण्यावरून देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया, म्हणाले, “एवढ्या मोठ्या संख्येने…”

संबंधित बातम्या

वर्धा: डॉक्टर तुम्हीसुद्धा! परिचारिकेस मिठी मारून…
धनगर समाजाच्या सक्षमीकरणासाठी २२ योजना, अंमलबजावणीचे आदेश
मंत्रालयातील संत गाडगेबाबांची ‘दशसूत्री’ हटवल्यामुळे समाजमाध्यमातून रोष; यवतमाळचे सामाजिक कार्यकर्ते संतोष अरसोड यांचे पत्र सार्वत्रिक
नागपूर : आता यंत्रमानव करणार महापालिकेच्या मलवाहिनीची स्वच्छता
बच्चू कडू-राणा यांच्यातील वाद मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री मिटवतील; बावनकुळे यांचा दावा

व्हिडिओ

ताज्या बातम्या
Dutee Chand Marriage: समलैंगिक साथीदारासोबत अ‍ॅथलीट द्युती चंदचा विवाह संपन्न, सोशल मीडियावर फोटो व्हायरल
इंडोनेशियात विवाहपूर्व शरीरसंबंध बेकायदा ठरणार, येतोय नवीन कायदा
जॉन्सन्सची बेबी टाल्कम पावडर वापरासाठी सुरक्षित; प्रयोगशाळांतील अहवातून स्पष्ट
मुंबई: नायर दंत रुग्णालयात उभारणार अद्ययावत प्रयोगशाळा
मुंबई: नवजात बालकाला इमारतीवरून फेकणाऱ्या महिलेला तीन वर्षांनी जामीन