नागपूर : सैन्यदल भरती नागपूर कार्यालयाने वेगवेगळ्या पदांसाठी अग्निवीर भरतीचा कार्यक्रम सोमवारी जाहीर केला. जनरल ड्युटी, तांत्रिक आणि लिपिक पदासाठी १० जून २०२३ पासून नागपुरात भरती मेळावा होत आहे. पहिल्या फेरीत पात्र उमेदवारांची वैद्यकीय चाचणी २५ ते १७ जून २०२३ दरम्यान घेतली जाईल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा – बुलढाणा : विकासाच्या नावावर विस्थापन, विषमता अन् विनाश रेटला जातोय; मेधा पाटकर यांची टीका, म्हणाल्या “विदर्भ कापसाचे आगार, पण..”

विदर्भांतील (बुलडाणा जिल्हा वगळून) पात्र पुरुष उमेदवारांसाठी सैन्य भरती मेळावा विभागीय क्रीडा संकुल, मानकापूर, नागपूर येथे १० जून २०२३ ते १७ जून २०२३ या कालावधीत आयोजित केला जाईल. हा मेळावा आर्मी रिक्रूटिंग ऑफिस, नागपूर आयोजित करीत आहे. मेळाव्यात सहभागी होण्यासाठी निवडलेल्या उमेदवारांसाठी प्रवेशपत्रे संकेतस्थळावर अपलोड करण्यात आली आहेत. उमेदवारांना त्यांच्या वैयक्तिक आयडी लॉगिनद्वारे त्यांना डाउनलोड करता येईल.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Army recruitment nagpur office announced on monday the agniveer recruitment program for various posts rbt 74 ssb
First published on: 29-05-2023 at 15:11 IST