scorecardresearch

Premium

चंद्रपूर जिल्ह्यात सुगंधी तंबाखू तस्करी जोरात

जिल्ह्यात सुगंधी तंबाखू व दारूची मोठ्या प्रमाणात तस्करी सुरू आहे. अवैध सुगंधी तंबाखु तस्करी करतांना ९ लाखाचा माल जप्त करण्यात आला आहे.

Aromatic tobacco smuggling in Chandrapur
बल्लारपूर येथे एक कोटींचा सुगंधीत तंबाखू पकडल्याचे प्रकरण ताजे असतानाच दुर्गापूर येथे ९ लाखाचा अवैध सुगंधी तंबाखू पकडला आहे.(फोटो- प्रातिनिधिक छायाचित्र)

लोकसत्ता टीम

चंद्रपूर: जिल्ह्यात सुगंधी तंबाखू व दारूची मोठ्या प्रमाणात तस्करी सुरू आहे. अवैध सुगंधी तंबाखु तस्करी करतांना ९ लाखाचा माल जप्त करण्यात आला आहे. तर पांढऱ्या गोणीत ३० दारूच्या बॉटल जप्त करण्यात आल्या.

बल्लारपूर येथे एक कोटींचा सुगंधीत तंबाखू पकडल्याचे प्रकरण ताजे असतांनाच दुर्गापूर येथे ९ लाखाचा अवैध सुगंधी तंबाखू पकडला आहे. चंद्रपुर जिल्ह्यात वाहतूक पोलिसांनी ९ लाख रूपयांचा अवैध सुंगधित तंबाखु जप्त केला आहे. या कारवाईमध्ये दोघांना अटक केली आहे. दुर्गापूरकडून चंद्रपुरात येणाऱ्या एका वाहनामध्ये नाका बंदी चौकशी दरम्यान सापडला. यावेळी सहाय्यक पोलिस निरीक्षक सुधीर जाधव, संदीप जाधव यांनी कारवाई केली. मध्यरात्री झालेल्या कारवाईमुळे अनेकांचे धाबे दणाणाले आहेत.

आणखी वाचा-१२ वर्षीय मुलीने प्रियकराला मॅसेज पाठवला अन् ..

याप्रकरणाचा अधिक तपास रामनगर पोलिस करत आहेत. बल्लारपूर रेल्वे पोलिसांनी दारूच्या ३० बॉटल पकडल्या आहेत. काझीपेठ जिल्हा हनवाकोंडा तेलंगणा येथील कपाट येथे आरपीएफ व जीआरपी यांनी संयुक्त झडती घेतली असता पांढऱ्या गोणीत ३० दारूच्या बाटल्या आढळून आल्याने जीआरपी बल्लारशाह यांनी आरोपीला ताब्यात घेऊन कारवाई केली, त्यामध्ये विदेशी दारूच्या ३० बॉटल्स आढळून आल्या. त्याची किंमत १३ हजार २०० रुपये आहे. पुढील कारवाई जीआरपी बल्लारशाह पोलीस करत आहेत. ही कारवाई आरपीएफ बल्लारशाहचे पोलीस निरीक्षक पाठक यांच्या सुचनेनुसार पोलीस उपनिरीक्षक मंगेश पायघन, कॉन्स्टेबल ललित कुमार यांच्या सुचनेनुसार नागपूरचे एएसआय बघेल, रवींद्र खंडारे व जीआरपीचे नीलेश यांच्या सुचनेवरून करण्यात आली.

Latest Comment
View All Comments
Post Comment

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Aromatic tobacco smuggling in chandrapur district rsj 74 mrj

First published on: 02-10-2023 at 11:26 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×