scorecardresearch

दिल्लीच्या उपमुख्यमंत्र्यांना अटक, बुलढाणा ‘आप’तर्फे काळा दिवस पाळून निषेध

आपचे नेते तथा दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांना केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआयने) केलेल्या अटकेचा बुलढाणा शहर आम आदमी पक्षाने निषेध केला आहे.

app party

बुलढाणा : आपचे नेते तथा दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांना केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआयने) केलेल्या अटकेचा बुलढाणा शहर आम आदमी पक्षाने निषेध केला आहे. यावेळी जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले.

दिल्लीचे शिक्षणमंत्री व उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्यावर केंद्र सरकारने बनावट गुन्हे दाखल करून त्यांना अटक केली आहे. ‘आप’तर्फे आज सोमवारी जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन या कारवाईचा निषेध करण्यात आला. ‘आप’तर्फे आज काळा दिवस पाळण्यात आल्याचे विष्णू डांगे, दीपक मापारी, गणेश इंगळे, प्रसाद घेवंदे, सिकंदर शहा, अविनाश खंडाळे, शाईद शहा, शेख इरफान यांनी सांगितले.

मराठीतील सर्व नागपूर / विदर्भ ( Nagpur ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 27-02-2023 at 18:39 IST
ताज्या बातम्या