scorecardresearch

गडचिरोली: ७० लाख दे, अन्यथा…; खंडणी वसुलीप्रकरणी १० नक्षल समर्थकांना अटक

नक्षलवादी असल्याचे सांगून बांधकाम कंत्राटदाराकडून ७० लाख रुपयांची खंडणी वसूल करण्याचा प्रयत्न करणाऱ्या १० नक्षल समर्थकांना अहेरी तालुक्यातील पेरमिली पोलिसांनी अटक केली.

गडचिरोली: ७० लाख दे, अन्यथा…; खंडणी वसुलीप्रकरणी १० नक्षल समर्थकांना अटक
१० नक्षल समर्थकांना अहेरी तालुक्यातील पेरमिली पोलिसांनी अटक केली

नक्षलवादी असल्याचे सांगून बांधकाम कंत्राटदाराकडून ७० लाख रुपयांची खंडणी वसूल करण्याचा प्रयत्न करणाऱ्या १० नक्षल समर्थकांना अहेरी तालुक्यातील पेरमिली पोलिसांनी अटक केली.चैनू आत्राम (३९), दानू आत्राम (२९) दोघेही रा. आलदंडी, शामराव वेलादी (४५), संजय वेलादी (३९), किशोर सोयाम (३४) तिघेही रा.चंद्रा, बाजू आत्राम (२८), रा. येरमनार टोला, मनिराम आत्राम ( ४५) रा. रापल्ले, जोगा मडावी (५०) रा. येरमनार टोला, लालसू तलांडे (३०) रा. येरमनार व बजरंग मडावी (४०) रा. मल्लमपल्ली ता. अहेरी, अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. काही जणांनी नक्षल्यांच्या वेशभूषेत ५ नोव्हेंबरच्या रात्री बांडिया नदीवर सुरू असलेल्या पुलाच्या बांधकामस्थळी जाऊन तेथील कर्मचाऱ्याचे अपहरण केले होते.

हेही वाचा >>>नागपूर: चांगलं असून चालत नाही, चांगल दिसावंही लागते; गडकरींची भन्नाट मार्केटिंग आयडिया

त्यानंतर त्यास ७० लाख रुपयांची मागणी केली. पैसे न दिल्यास बांधकाम साहित्याची जाळपोळ करून जीवे मारण्याची धमकीही दिली. यासंदर्भात तक्रार केल्यानंतर पोलिसांनी चौकशी केली असता ते सर्वजण नक्षल समर्थक असल्याचे निष्पन्न झाले. याप्रकरणी उपरोक्त १० जणांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून नक्षल गणवेश, भरमार बंदुका व अन्य साहित्य ताब्यात घेण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.

मराठीतील सर्व नागपूर / विदर्भ ( Nagpur ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 27-11-2022 at 19:56 IST

संबंधित बातम्या