यवतमाळ : police recruitment fraud पोलीस भरती प्रक्रियेत एका उमेदवाराने बनावट प्रकल्पग्रस्ताचे प्रमाणपत्र जोडून नोकरी बळकाविण्याचा प्रयत्न केला होता. पोलीस प्रशासनाने केलेल्या चौकशीत बीड येथे सदर प्रमाणपत्र बनावट असल्याचे निष्पन्न झाले. प्रमाणपत्र बनवून देणा-या मुख्य सूत्रधारास सोलापूर जिल्ह्यातील बार्शी येथून अटक करण्यात आली. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखा व दराटी पोलिसांनी संयुक्तरीत्या केली.

नवनाथ शहाजी कदम (रा. बार्शी, जि. सोलापूर), असे अटकेतील मुख्य सूत्रधाराचे नाव आहे. तो एका कोचिंग क्लासेसमध्ये शिक्षक म्हणून काम करतो. यवतमाळ पोलीस दलात चालक पोलीस शिपाई ५८ व पोलीस शिपाई २४४ पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात आली. सदर पोलीस भरती दरम्यान प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त तसेच इतर आरक्षणाचा फायदा घेवून पात्र उमेदवारांच्या प्रमाणपत्राची पडताळणी करण्याचे निर्देश विशेष पोलीस महानिरीक्षक, प्रशिक्षण व खास पथके यांनी पोलीस दलास दिले होते. त्या अनुषंगाने यवतमाळ घटकातील प्रमाणपत्राचा लाभ घेणार्या  चार उमेदवारांच्या प्रमाणपत्रांची पडताळणी प्रत्यक्ष बीड येथे जाऊन करण्यात आली.

Baramati Namo Maharojgar Melava
निमंत्रण पत्रिकेतील आणखी एक घोळ सुधारण्यासाठी प्रशासनाची धावाधाव
tax fraud case
१७५ कोटींचे कर फसणूक प्रकरण : विक्रीकर अधिकारी व १६ जणांवर गुन्हा दाखल, एसीबीची कारवाई
MLA Abhimanyu Pawar request to Deputy Chief Minister Devendra Fadnavis regarding contract recruitment in MPSC Pune
एमपीएससीत कंत्राटी भरती नको…; भाजपच्या कोणत्या आमदाराने केली मागणी?
treatment in private hospitals
गरीब रुग्णांना खासगी, धर्मदाय रुग्णालयात उपचार मिळणार, राज्यस्तरीय विशेष मदत कक्ष कार्यान्वित

हेही वाचा >>> नागपूर : प्रिन्स तुलीला पोलीस ठाण्यात ‘व्हिआयपी ट्रिटमेंट’? सोशल मीडियावर फोटो व्हायरल

किशोर किसन तोरकड (रा. बोरीवन, ता. उमरखेड) याचे प्रकल्पग्रस्ताचे प्रमाणपत्र बनावट असल्याचे निष्पन्न झाले. पोलीस अधीक्षकांच्या आदेशानुसार तरुणाविरुद्घ फसवणूक केल्याचा गुन्हा नोंदविण्यात आला. किसन तोरकड यास शुक्रवारी अटक करण्यात आली होती. सदर प्रमाणपत्र सोलापूर जिल्ह्यातील बार्शी येथील शिक्षक नवनाथ कदम याने तयार करून दिल्याचे तपासात निष्पन्न झाले. दराटी व एलसीबीच्या पथकाला सोलापूर जिल्ह्यात पाठविण्यात आले. त्यांनी शोध घेवून मुख्य सूत्रधारास अटक केली. ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. पवन बन्सोड, अपर पोलीस अधीक्षक पीयूष जगताप, पोलीस निरीक्षक प्रदीप परदेशी यांच्या मार्गदर्शनात भरत चापाईतकर, उपनिरीक्षक सागर भारस्कर, संभाजी केंद्रे, आडे, हेलगीर, सोहेल मिर्झा, ताज मोहम्मद आदींनी सायबर सेलच्या मदतीने केली.