Premium

यवतमाळ : पोलीस भरतीसाठी खोटे प्रमाणपत्र देणाऱ्या मुख्य सूत्रधारास बार्शीत बेड्या

police recruitment fraud पोलीस भरती प्रक्रियेत एका उमेदवाराने बनावट प्रकल्पग्रस्ताचे प्रमाणपत्र जोडून नोकरी बळकाविण्याचा प्रयत्न केला होता.

police bharti fake certificate arrested
पोलीस भरतीसाठी खोटे प्रमाणपत्र देणाऱ्या मुख्य सूत्रधारास बार्शीत बेड्या

यवतमाळ : police recruitment fraud पोलीस भरती प्रक्रियेत एका उमेदवाराने बनावट प्रकल्पग्रस्ताचे प्रमाणपत्र जोडून नोकरी बळकाविण्याचा प्रयत्न केला होता. पोलीस प्रशासनाने केलेल्या चौकशीत बीड येथे सदर प्रमाणपत्र बनावट असल्याचे निष्पन्न झाले. प्रमाणपत्र बनवून देणा-या मुख्य सूत्रधारास सोलापूर जिल्ह्यातील बार्शी येथून अटक करण्यात आली. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखा व दराटी पोलिसांनी संयुक्तरीत्या केली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नवनाथ शहाजी कदम (रा. बार्शी, जि. सोलापूर), असे अटकेतील मुख्य सूत्रधाराचे नाव आहे. तो एका कोचिंग क्लासेसमध्ये शिक्षक म्हणून काम करतो. यवतमाळ पोलीस दलात चालक पोलीस शिपाई ५८ व पोलीस शिपाई २४४ पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात आली. सदर पोलीस भरती दरम्यान प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त तसेच इतर आरक्षणाचा फायदा घेवून पात्र उमेदवारांच्या प्रमाणपत्राची पडताळणी करण्याचे निर्देश विशेष पोलीस महानिरीक्षक, प्रशिक्षण व खास पथके यांनी पोलीस दलास दिले होते. त्या अनुषंगाने यवतमाळ घटकातील प्रमाणपत्राचा लाभ घेणार्या  चार उमेदवारांच्या प्रमाणपत्रांची पडताळणी प्रत्यक्ष बीड येथे जाऊन करण्यात आली.

हेही वाचा >>> नागपूर : प्रिन्स तुलीला पोलीस ठाण्यात ‘व्हिआयपी ट्रिटमेंट’? सोशल मीडियावर फोटो व्हायरल

किशोर किसन तोरकड (रा. बोरीवन, ता. उमरखेड) याचे प्रकल्पग्रस्ताचे प्रमाणपत्र बनावट असल्याचे निष्पन्न झाले. पोलीस अधीक्षकांच्या आदेशानुसार तरुणाविरुद्घ फसवणूक केल्याचा गुन्हा नोंदविण्यात आला. किसन तोरकड यास शुक्रवारी अटक करण्यात आली होती. सदर प्रमाणपत्र सोलापूर जिल्ह्यातील बार्शी येथील शिक्षक नवनाथ कदम याने तयार करून दिल्याचे तपासात निष्पन्न झाले. दराटी व एलसीबीच्या पथकाला सोलापूर जिल्ह्यात पाठविण्यात आले. त्यांनी शोध घेवून मुख्य सूत्रधारास अटक केली. ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. पवन बन्सोड, अपर पोलीस अधीक्षक पीयूष जगताप, पोलीस निरीक्षक प्रदीप परदेशी यांच्या मार्गदर्शनात भरत चापाईतकर, उपनिरीक्षक सागर भारस्कर, संभाजी केंद्रे, आडे, हेलगीर, सोहेल मिर्झा, ताज मोहम्मद आदींनी सायबर सेलच्या मदतीने केली.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Arrested in barshi to the mastermind fake certificate for police recruitment nrp 78 ysh

First published on: 30-05-2023 at 12:46 IST
Next Story
मरावे परी देहरूपी उरावे! मरणोत्तर देहदानाचा वृद्ध दाम्पत्याचा संकल्प; कार्यास देणगीही दिली