नागपूर: शेतकरी आत्महत्या हे आजचे सर्वात मोठे विदारक चित्र आहे.ते बदलणे आवश्यक आहे. राज्यात सरकार कुणाचेही असो, ज्या दिवशी शेतकरी आत्महत्या करणे थांबवेल त्या दिवशी महाराष्ट्र सुजलाम सुफलाम समजावा, असे प्रतिपादन प्रसिद्ध अभिनेते नाना पाटेकर यांनी केले.काटोल येथील अरविंद सहकारी बँकेच्या आवार दिवंगत अरविंदबाबू देशमुख यांच्या पुतळ्याचे अनावरण शुक्रवारी नाना पाटेकर यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी माजी मंत्री रणजित देशमुख, भाऊसाहेब भोगे,माजी आमदार डॉ आशिष देशमुख, बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राव, उपाध्यक्ष विजय धोटे,दिनकर राऊत,आदी उपस्थितीत होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कार्यक्रमाच्या सुरुवातीला काटोल नरखेड तालुक्यातील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या विधावा पत्नीला १५ हजाराचे धनादेश नाना पाटेकर यांच्या हस्ते वाटप करण्यात आले, यावेळी नाना पाटेकर भावुक झाले. ते म्हणाले, आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांच्या विधवा पत्नीला धनादेश येण्याचीच वेळ येता कामा नये. याकरिता पर्यन्त करण्याची गरज आहे. राजकारण बाजूला ठेऊन हा विषय हाताळावा लागेल. अनेकदा कानी पडते की, महाराष्ट्र देश्यात अव्वल आहे माझ्या मते जेव्हा शेतकरी बळकट होईल तेव्हा आणि तेव्हाच महाराष्ट्र राज्यात पहिला होईल .

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: As soon as farmer suicides stop the state will develop government of maharashtra nana patekar in nagpur tmb 01
First published on: 03-12-2022 at 11:58 IST