scorecardresearch

Premium

गोंदिया: जीव मुठीत घेत पुराच्या पाण्यातून विद्यार्थ्यांचा प्रवास!

संबंधित विभागाने पुलाचे बांधकाम करून उंची वाढविण्यात यावी, अशी मागणी केली येथील रहिवाशांकडून केली जात आहे.

kanhalgaon bridge flooded rain, students travel through flood water
गोंदिया: जीव मुठीत घेत पुराच्या पाण्यातून विद्यार्थ्यांचा प्रवास! (छायाचित्र- लोकसत्ता टीम)

गोंदिया: देवरी तालुक्यातील कन्हाळगाव या मुख्य मार्गावरून असलेल्या नाल्यावरील पुलाची उंची कमी असल्याने दरवर्षी थोडाफार पाऊस पडला की पुलाला पूर येतो. यामुळे प्रवाश्यांसह विद्यार्थ्यांना जीव मुठीत घेवून पुराच्या पाण्यातून प्रवास करावा लागतो.

तीन दिवसापूर्वी आलेल्या पावसामुळे पुन्हा पूर आला. मात्र, या संदर्भात एकही जनप्रतिनिधी तसेच प्रशासन लक्ष देत नसल्याने केव्हाही एखादी अप्रिय घटना घडू शकते. संबंधित विभागाने पुलाचे बांधकाम करून उंची वाढविण्यात यावी, अशी मागणी केली येथील रहिवाशांकडून केली जात आहे. उल्लेखनीय असे की, पूरामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे.

health minister tanaji sawant, sarathi organization, sarathi hostel in nashik, land for hostel sarathi
नाशिकमध्ये वसतिगृहासाठी सारथी संस्थेला जागा उपलब्ध करण्याचे निर्देश
Talathi exam candidates check answer sheet tomorrow pune
तलाठी परीक्षेच्या उमेदवारांसाठी उद्यापासून उत्तरतालिका पाहण्याची सुविधा
Now 50 e-buses running service Jalgaon residents
जळगावकरांच्या सेवेत लवकरच ई-बस; जिल्हाधिकार्यांकडून थांब्यांसाठी जागांची पाहणी
traders plot of 1000 sqft rehabilitation project onion potato market apmc vashi
कांदा व्यापाऱ्यांना हजार फुटांचे गाळे? मोफत गाळ्यांसाठी निधी उभारणीची धडपड

हेही वाचा… सिनेस्टाईल थरार: दरोड्याच्या तयारीत असलेले १० दरोडेखोर जेरबंद; १३.०६ लाखांचा मुद्देमाल जप्त

देवरी तालुक्यातील कन्हाळगाव मुख्य रस्ता देवरी शहराला जोडण्यात आला असून, या मुख्य रस्त्यावर कन्हाळगाव, बोवाटोला, जुगरूटोला, सिरजारटोला, मुरमाडीटोला, मंगेझरी असे अनेक छोटे छोटे खेडेगाव जोडले आहेत. या रस्त्यावरून अनेक नागरिक तसेच विद्यार्थी ये जा करीत असतात. या मुख्य रस्त्यावर लहान लहान नाले वाहत असून, या नाल्यांवर पुल बांधलेले आहेत. उन्हाळा तसेच हिवाळ्यात कन्हाळगाव मुख्य मार्ग आवागमनासाठी, काहीही अडचणी येत नाही. परंतु, पावसाळ्यामध्ये या रस्त्यावरून प्रवास करणे खूप धोकादायक असते. या रस्त्यावरून येताना पुराच्या पाण्यातून मार्ग शोधावा लागत असतो. विद्यार्थ्यांना त्यांचे पालकवर्ग पुराच्या पाण्यातून मार्ग काढून होणारे शैक्षणिक नुकसान टाळत असतात. अशा पुराच्या पाण्यातून मार्ग काढताना जर एखाद्या वेळी धोका निर्माण झाला तर याची जबाबदारी क्षेत्रातील जनप्रतिनिधी तसेच संबंधित विभाग घेईल का?. असा सवाल नागरिकांमध्ये उत्पन्न झालेला आहे.

कन्हाळगाव नाल्यावरील पुलाची उंची वाढविण्यासाठी प्रशासनाला तसेच जनप्रतिनिधीला वारंवार मागणी करण्यात आली. मात्र, मागणीची दखल घेण्यात आली नाही. तत्कालीन खा. महादेवराव शिवनकर यांच्या काळापासून या पुलाची उंची वाढविण्यासाठी कित्येक आमदार, खासदारांना निवेदन देण्यात आले. मात्र आतापर्यंत या पुलाची उंची वाढविण्यात आली नाही. तसेच दुरुस्तीही करण्यात आली नाही. -राजेंद्र बिसेन, सरपंच, कन्हाळगाव

Latest Comment
View All Comments
Post Comment

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: As the kanhalgaon bridge in gondia is flooded due to rain students have to travel through the flood water sar 75 dvr

First published on: 27-09-2023 at 17:06 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×