नागपूर : राज्यात पोलीस निरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांची पदे रिक्त असल्यामुळे पोलीस महासंचालक कार्यालायाने पदोन्नतीची प्रक्रिया सुरू केली आहे. मुंबई आस्थापना विभागाने प्रसिद्ध केलेल्या पत्रानुसार, जूनच्या दुसऱ्या आठवड्यात जवळपास ४५० सहायक पोलीस निरीक्षकांना पदोन्नती देण्यात येणार आहे. पोलीस अधिकाऱ्यांच्या पदोन्नतीचा विषय ‘लोकसत्ता’ने वारंवार पुढे आणला होता, हे विशेष.

राज्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी आणि आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पोलीस निरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांची उणिव भासू नये म्हणून पोलीस महासंचालक कार्यालयाने तयारी सुरू केली आहे. आस्थापना विभागाचे अप्पर पोलीस महासंचालक संजीव कुमार सिंघल यांनी आदेश काढून एप्रिल महिन्यांतच सहायक पोलीस निरीक्षकांना पदोन्नतीची प्रक्रिया सुरू केली होती. त्यामध्ये राज्यातील १०३ क्रमांकाच्या तुकडीतील सहायक पोलीस निरीक्षकांना संवर्ग मागण्यात आले होते. त्यानुसार जवळपास साडेचारशेवर सहायक पोलीस निरीक्षकांनी संवर्गपत्र भरून दिले होते. ज्यांना पसंतीक्रमानुसार महसूल विभाग मिळाला नाही, अशा ८६ सहायक निरीक्षकांना चक्राकार पद्धतीने कोकण-२ हा महसूल वर्ग वाटप झाला आहे. त्यामुळे शुक्रवारी पुन्हा कोकण-२ विभागासाठी पसंतीक्रम मागविले गेले. त्यामुळे सहायक निरीक्षकांना पदोन्नतीची प्रक्रिया अंतिम टप्प्यात असल्याचे स्पष्ट झाले असून जूनच्या दुसऱ्या आठवड्यात प्रत्यक्ष पदोन्नती मिळण्याची शक्यता आहे.

‘आरटीई’तील दुरुस्तीबाबत निर्णय पुढील आठवड्यात; सरकारच्या दाव्यावर न्यायालयाचे प्रश्नचिन्ह | Decision on amendment in RTE next week Court questions government claim Mumbai
‘आरटीई’तील दुरुस्तीबाबत निर्णय पुढील आठवड्यात; सरकारच्या दाव्यावर न्यायालयाचे प्रश्नचिन्ह
cidco senior planner recruitment marathi news
पनवेल: सिडकोने वरिष्ठ नियोजनकार या पदांची भरती प्रक्रीया रद्द केली
The role of SEBI  SAT is important to maintain investment friendly environment
‘गुंतवणुकीस्नेही वातावरण राखण्यास सेबी, सॅटची भूमिका महत्त्वपूर्ण’; बाजारातील उधाणाबाबत सरन्यायाधीश चंद्रचूड यांचा सावधगिरीचा इशारा
nari shakti doot app
चंद्रपूर : ‘लाडक्या बहिणीं’ची अडचण; ‘नारीशक्ती दूत ॲप’ बंदच, ऑनलाइन अर्ज प्रक्रिया खोळंबली
Recruitment, MPSC,
‘एमपीएससी’कडून सरळसेवा भरती, फडणवीसांच्या घोषणेमुळे समाधान, मात्र ही निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन…
Neet ug Exam Confusion Court refusal to postpone the counseling process
नीट-यूजी परीक्षा गोंधळ;  समुपदेशन प्रक्रिया पुढे ढकलण्यास न्यायालयाचा नकार
delay , RTE, admission,
आरटीई प्रवेश प्रक्रिया लांबविल्याने पालक चिंतेत, शासनाच्या चुकीमुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याचा आरोप
mht cet result date latest marathi news
एमएचटी-सीईटीच्या निकालाची प्रतीक्षा संपणार…जाहीर झाली तारीख आणि वेळ…

हेही वाचा >>>अकोला : दूषित पाण्यामुळे ४९ ग्रामस्थांची प्रकृती बिघडली

पोलीस अधिकाऱ्यांमध्ये आनंद

पदोन्नतीच्या कक्षेत असूनही सहायक पोलीस अधिकाऱ्यांना अडीच वर्षांपासून पदोन्नती मिळत नव्हती. मात्र, आता ही प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. त्यामुळे सहायक पोलीस निरीक्षकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. सहायक पोलीस निरीक्षकांच्या पदोन्नतीमुळे राज्यात पोलीस अधिकाऱ्यांच्या संख्येतही मोठी वाढ होणार आहे.

न्यायालयाच्या आदेशानंतर प्रक्रिया

महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाने (एमपीएससी) घेतलेल्या परीक्षेत उत्तीर्ण १०२ तुकडीचे सहायक पोलीस अधिकारी गेल्या अडीच वर्षांपासून पदोन्नतीच्या कक्षेत होते. मात्र, गृहमंत्रालय आणि महासंचालक कार्यालयाच्या निष्काळजीपणामुळे पदोन्नतीची प्रक्रिया रखडली होती. त्यामुळे अधिकाऱ्यांनी थेट न्यायालयाचे दार ठोठावले होते. न्यायालयाच्या आदेशानंतर पदोन्नतीची प्रक्रिया सुरू झाली.