As there is no charging system half of the electric buses stand in depo Nagpur news ysh 95 | Loksatta

नागपूर: चार्जिंगची व्यवस्था नसल्यामुळे निम्म्या इलेक्ट्रिक बसेस आगरातच उभ्या राहणार

महापालिका प्रशासनाकडून चार्जिंगची व्यवस्था नसल्यामुळे ४० पैकी २० बसेसच धावणार आहेत. उर्वरित बसेस आगारातच उभ्या राहतील.

नागपूर: चार्जिंगची व्यवस्था नसल्यामुळे निम्म्या इलेक्ट्रिक बसेस आगरातच उभ्या राहणार
संग्रहित छायाचित्र/लोकसत्ता

नागपूर : पर्यावरणपूरक  वाहतुकीसाठी शहर बसच्या ताफ्यात ४० इलेक्ट्रिक बसेस दाखल झाल्या आहेत. मात्र, महापालिका प्रशासनाकडून चार्जिंगची व्यवस्था नसल्यामुळे ४० पैकी २० बसेसच धावणार आहेत. उर्वरित बसेस आगारातच उभ्या राहतील.

इलेक्ट्रिक बस सुरू झाल्यानंतर इंधनावरील खर्चात बचत होणार आहे. त्यामुळे शहराचे प्रदूषण कमी होण्यास मदत होईल. याच दृष्टिकोनातून शहरात १७० बसेस दाखल होणार आहेत. त्यापैकी पहिल्या टप्प्यात ४० बसेस दाखल झाल्या आहेत. गेल्या वर्षभरापासून ४० बसेसची नागरिकांना प्रतीक्षा करावी लागली. मात्र, या बसेस आल्यानंतर महापालिका प्रशासनाकडून मात्र चार्जिंगची व्यवस्था करण्यात आली नाही. त्यामुळे प्रवाशांना आणखी काही दिवस डिझेलच्या बसमध्ये प्रवास करावा लागणार आहे.

हेही वाचा >>> नागपूर: ‘इंडियन सायन्स’च्या नोंदणीसाठी विद्यार्थ्यांना १२०० रुपये आणि इतरांना २००० रुपये शुल्क!

महापालिका प्रशासनाने चार्जिंग स्टेशनसाठी प्रस्ताव मागितले. त्यासाठी करात सूट देण्याची घोषणाही केली. मात्र एकही प्रस्ताव महापालिकेकडे आला नाही. त्यामुळे आता महापालिकेला चार्जिंग केंद्रासाठी जागा शोधावी लागणार आहे. त्यानंतर उर्वरित बसेस धावणार असल्याचे महापालिकेच्या परिवहन विभागाकडून सांगण्यात आले.

मराठीतील सर्व नागपूर / विदर्भ ( Nagpur ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 02-12-2022 at 09:37 IST
Next Story
नागपूर: ‘इंडियन सायन्स’च्या नोंदणीसाठी विद्यार्थ्यांना १२०० रुपये आणि इतरांना २००० रुपये शुल्क!