अकोला : आषाढी एकादशी निमित्ताने वारकऱ्यांना पंढरीचे वेध लागले आहेत. मध्य रेल्वेकडून पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांच्या सोयीसाठी नागपूर-मिरज, नवी अमरावती-पंढरपूर, खामगाव-पंढरपूर आणि भुसावळ-पंढरपूर या मार्गांवर आषाढी एकादशी विशेष गाड्या चालविण्यात येणार आहेत.
नागपूर–मिरज विशेष गाडीच्या चार फेऱ्या
गाडी क्र. ०१२०५ विशेष २३ आणि २४ जुलै रोजी नागपूर येथून ०८.५० वाजता सुटेल व दुसऱ्या दिवशी मिरज येथे ११.५५ वाजता पोहोचेल. गाडी क्र. ०१२०६ विशेष २४ आणि २५ रोजी मिरज येथून १२.५५ वाजता सुटेल व दुसऱ्या दिवशी नागपूर येथे १२.२५ वाजता पोहोचेल. या गाडीला अजनी, वर्धा, पुलगाव, धामणगाव, चांदूर, बडनेरा, मूर्तिजापूर, अकोला, शेगाव, मलकापूर, भुसावळ, जळगाव, चाळीसगाव, मनमाड, कोपरगाव, बेलापूर, अहिल्यानगर, दौंड, कुर्डुवाडी, पंढरपूर, सांगोला, म्हसबा डोंगरगाव, जत रोड, ढाळगाव, कवठेमहांकाळ, सलगरे आणि आरग येथे थांबा राहील. दोन वातानुकूलित तृतीय श्रेणी, १० शयनयान, चार सामान्य द्वितीय श्रेणी तसेच दोन सामान-सह-गार्ड ब्रेकव्हॅन अशी गाडीची रचना राहील.
नवी अमरावती-पंढरपूर विशेष गाडी धावणार
गाडी क्र. ०१११९ विशेष २१ आणि २४ रोजी नवी अमरावती येथून १४.४० वाजता सुटेल व दुसऱ्या दिवशी पंढरपूर येथे ०९.१० वाजता पोहोचेल. गाडी क्र. ०११२० विशेष २२ आणि २५ रोजी पंढरपूर येथून १९.३० वाजता सुटेल व दुसऱ्या दिवशी नवी अमरावती येथे १२.५० वाजता पोहोचेल. या गाडीला बडनेरा, मूर्तिजापूर, अकोला, शेगाव, जळंब, नांदुरा, मलकापूर, बोदवड, भुसावळ, जळगाव, पाचोरा, चाळीसगाव, नांदगाव, मनमाड, कोपरगाव, बेलापूर, अहिल्यानगर, दौंड आणि कुर्डुवाडी येथे थांबा राहणार आहे.
खामगाव–पंढरपूर विशेष गाडीच्या चार फेऱ्या
गाडी क्र. ०११२१ विशेष २१ आणि २३ जुलै रोजी खामगाव येथून ११.३० वाजता सुटेल व दुसऱ्या दिवशी पंढरपूर येथे ०३.३० वाजता पोहोचेल. गाडी क्र. ०११२२ विशेष २२ आणि २४ रोजी पंढरपूर येथून ५ वाजता सुटेल व त्याच दिवशी खामगाव येथे १९.३० वाजता पोहोचेल. या गाडीला जळंब, नांदुरा, मलकापूर, बोदवड, भुसावळ, जळगाव, पाचोरा, चाळीसगाव, नांदगाव, मनमाड, कोपरगाव, बेलापूर, अहिल्यानगर, दौंड आणि कुर्डुवाडी येथे थांबा राहणार आहे. या विशेष गाड्यांमुळे वारकऱ्यांना मोठी सुविधा होणार आहे.
