scorecardresearch

“…तर आम्ही न्यायालयात दाद मागू”; आशिष देशमुखांचा थेट मल्लिकार्जुन खरगेंना इशारा!

गेल्या ३० वर्षांपासून त्याच त्या लोकांना संधी मिळत असेल, तर पक्ष म्हणून काँग्रेस कधीच प्रगती करू शकणार नाही, असेही ते म्हणाले.

ashish deshmukh demand election for cwc member
फोटो – लोकसत्ता ग्राफीक्स टीम

ज्याप्रकारे मल्लिकार्जून खरगे निवडून आले, त्याप्रमाणेच काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकारणीतील सदस्यांची नियुक्ती निवडणुकीद्वारे व्हावी, त्यांची थेट नियुक्ती होऊ नये, अशी मागणी काँग्रेस नेते आशिष देशमुख यांनी केली आहे. तसेच यासंदर्भात आम्ही दिल्लीत काही वकिलांशी चर्चा केली असून गरज पडल्यास यासाठी आम्ही न्यायालयात दाद मागू, असेही ते म्हणाले. टीव्ही ९ वृत्तवाहिनीशी बोलताना त्यांनी यासंदर्भात प्रतिक्रिया दिली.

हेही वाचा – “उद्धव ठाकरे, संजय राऊत हे कपिल शर्माप्रमाणे हास्यकलाकार..” किरीट सोमय्यांनी उडवली खिल्ली

काय म्हणाले आशिष देशमुख?

“काँग्रेसच्या संविधानानुसार पक्षातील मोठ्या पदावरील असलेली व्यक्ती निवडून यावी, अशी व्यवस्था आहे. मल्लिकार्जून खरगे हे निवडणुकीद्वारे काँग्रेसेचे अध्यक्ष झाले, याचा आम्हाला आनंदच आहे. मात्र, याबरोबरच काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकारिणीतील सदस्यांची नियुक्तीही निवडणुकीद्वारे व्हावी अशी अनेकांची इच्छा आहे. मात्र, गेल्या २८ वर्षांपासून या सदस्यांची थेट नियुक्ती पक्षाध्यक्षाद्वारे केली जात आहे”, अशी प्रतिक्रिया आशिष देशमुख यांनी दिली आहे. तसेच यासंदर्भात आम्ही काही नेत्यांनी दिल्लीतील काही वकिलांशी चर्चा केली असून गरज पडल्यास याप्रकरणी आम्ही न्यायालयात दाद मागू, इशाराही त्यांनी दिला.

हेही वाचा – “अनिल देशमुखांवर १०९ वेळा छापेमारी, हसन मुश्रीफांविरोधात हा विक्रम ईडी आणि…” सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल

“आमचा हा लढा पक्षश्रेष्ठींविरोधात नाही. ज्याप्रकारे मल्लिकार्जून खरगे निवडून आले, त्याप्रमाणेच काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकारणीतील सदस्य आणि प्रत्येक राज्याचे प्रदेशाध्यक्ष निवडून येण्यासंदर्भात काँग्रेसच्या संविधानात प्रावधान आहे, त्याची अंमलबजावणी व्हावी, एवढीच आमची मागणी आहे”, असेही ते म्हणाले.

हेही वाचा – “अनिल देशमुखांवर १०९ वेळा छापेमारी, हसन मुश्रीफांविरोधात हा विक्रम ईडी आणि…” सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल

“या देशाला केवळ काँग्रेस वाचवू शकते. मात्र, काँग्रेसला जुन्या कामाच्या पद्धतीतून बाहेर पडायला पाहिजे. काँग्रेसच्या कार्यकारिणीत नवीन लोकांनी येणं गरजेचं आहे. नुकताच तीन राज्याच्या निवडणुका झाल्या, त्यात कुठेच काँग्रेस दिसत नाही. गेल्या ३० वर्षांपासून त्याच त्या लोकांना संधी मिळत असेल, तर पक्ष म्हणून काँग्रेस कधीच प्रगती करू शकणार नाही”, अशी प्रतिक्रियाही त्यांनी दिली.

मराठीतील सर्व नागपूर / विदर्भ ( Nagpur ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 11-03-2023 at 15:19 IST
ताज्या बातम्या