नागपूर: भारतीयांच्या दैनंदिन जीवनात चहाला विशेष स्थान आहे. सकाळची सुरुवात चहापासून होते. घरी आलेल्या पाहुण्यांनाही चहा दिल्या जातो. चहाशिवाय दिनचर्या अपूर्ण मानली जाते. चहाचेही अनेक प्रकार आहेत. काळा चहा, हिरवा चहा, मसाला चहा, लेमन टी, आल्याचा चहा, गुळाचा चहा असे अनेक प्रकार आहेत. चहामुळे ताजेतवाने वाटते. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचाही ’चहा पे चर्चा’ कार्यक्रम चांगलाच लोकप्रिय राहिला. चहा हे केवळ पेय नसून भारतीय संस्कृतीचा अविभाज्य भाग बनला आहे.
पावसाळ्यात याच्या मागणीत वाढ असते. मुंबई राज्याची राजधानी असून देशाची आर्थिक राजधानी मानल्या जाते. जगभरातील लोक येथे येतात. विविध खाद्य पदार्थ आस्वाद आणि पेयांचा आनंद घेतात. परंतु राज्याचे वित्त राज्यमंत्री आशिष जयस्वाल म्हणाले की, ते मुंबईचा चहाच घेत नाही. त्यासाठी त्यांनी कारणही तसेच दिले.
नागपुरातील कार्यक्रमात त्यांनी केले वक्तव्य
नागपुरातील वसंतराव देशपांडे सभागृहात राज्यमाता गोमाता संवाद यात्रेचा समारोप झाला. पशुसंवर्धन विभाग व महाराष्ट्र गोसेवा आयोगाच्या वतीने या संवाद यात्रेच आयोजन करण्यात आले होते. गोसेवा, गोसंवर्धन आणि भारतीय संस्कृतीतील गोमातेचे महत्त्व जनमानसात रुजवण्यासाठी २२ जूनला यात्रेची सुरुवात झाली. एक हजारहून अधिक गोशाळांनी यात सहभाग नोंदवला.
१५ हजार गोशाळा संचालक, गोसेवक, गोपालक आणि शेतकऱ्यांशी थेट संवाद साधण्यात आला. २९ जिल्ह्यातून यात्रेचा प्रवास झाला. या समारोपीय कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, गृह राज्यमंत्री पंकज भोयर, खासदार माया इवनाते, पशुसंवर्धन विभागाचे आयुक्त किरण पाटील, गोसेवा आयोगाचे अध्यक्ष शेखर मुंदडा आदी उपस्थित होते. या कार्यक्रमात वित्त राज्यमंत्री आशिष जयस्वाल बोलत होते.
हे दिले कारण
भारत १४० कोटी लोकसंख्येचा देश आहे. जनगणनेनंतर नेमके आकडे समोर येतील. ऐवढ्या मोठ्या लोकसंख्या देशाला दुधाची गरज आहे. गायीच्या दूधापासून दही, ताक बनते. विविध प्रकारचे खाद्य पदार्थ तयार करण्यात येते. परंतु गायीची संख्या कमी आहे. गायीच्या दुधालाच चव राहिली नाही. चांगला चाराच नाही. मला ‘ऑर्गनिक ग्रास’ खाणाऱ्या गायीच्या दुधाचा चहा पिण्याची सवय आहे. त्यामुळे मुंबईची चहाच आवडत नाही. मुंबईची चहाच पित नसल्याचे ते म्हणाले. उत्तम चारा मिळाला नाही.
दुधाची गुणवत्ता राहणार नाही. चौकाचौकात प्लास्टिक पडले असतात. गायीला हात राहत नाही. त्या प्लास्टिकमधून खाद्या वेगळे करून खाण्याचा प्रयत्न ते करते. ते पाहून वेदना होतात. म्हणून गायींच्या चाऱ्यासाठी नवीन निर्णय केला. शासकीय जागा महिला बचत गटांना एक रुपये लीजवर चारा लागवडीसाठी देण्याचा निर्णय घेतला. नैसर्गिक आणि रासायनिक पदार्थामधील फरक माहिती नाही. कुणालाही खरे पदार्थ मिळत नसल्याचे ते म्हणाले.
