नागपूर: आई-वडिलांशी वाद झाल्याने संतापून घर सोडणाऱ्या सेलूतील (जि. वर्धा) १४ वर्षीय मुलीने नागपूर गाठले. बर्डीच्या मेट्रो स्टेशनवर येऊन ती एअरपोर्ट साऊथ स्थानकाची तिकीट मागण्याऐवजी साऊथ आफ्रिकेचे तिकीट मागू लागली. त्यातून गोंधळ उडाला.

रविवारची दुपारी, सीताबर्डी इंटरचेंज मेट्रो स्टेशनवर १३-१४ वर्षांच्या मुलीने तिकीट खिडकीवर आली व तिने दक्षिण कोरियाचे तिकीट हवे आहे” असे सांगितले. कर्मचाऱ्यांनी तिला मेट्रो फक्त नागपूरमधील प्रवासासाठी आहे, ती दक्षिण कोरिया जात नाही.असे सांगितले. पण ही मुलगी ठाम होती आणि ती ऐकायला तयार नव्हती.

काहीतरी गडबड असल्याचे एका अधिकाऱ्याच्या लक्षात आले व त्याने तिला आपल्या कक्षात बोलवून घेतले. तीला मेट्रो फक्त शहरातील अंतर्गत प्रवासाठी आहे हे सांगितले. तिच्याकडून व्यक्तिगत माहिती घेतली. ही मुलगी वर्धा जिल्ह्यातील सेलू येथील आहे, आपल्या आई-वडिलांसोबत वाद झाल्यानंतर ती कुणालाही काहीही न सांगता घरातून निघून आली होती. ती नागपूरला येऊन सीताबर्डी मेट्रो स्टेशनवर पोहोचली. तिला एअरपोर्ट साऊथ मेट्रो स्टेशनला जायचं होतं, पण तिकिट मागताना ती दक्षिण कोरियाचे तिकीट मागत होती. त्यामुळे गोंधळ झाला. मेट्रो अधिकाऱ्यांनी सेलू पोलिसांशी संपर्क साधला. दरम्यान ती बेपत्ता असल्याची तक्रार तिच्या पालकांनी सेलू पोलिस ठाण्यात दिली होती. या घटनेची माहिती मिळाल्यावर, सेलू पोलिस मुलीच्या आई-वडिलांना घेऊन ते सीताबर्डी मेट्रो स्टेशनवर पोहोचले आणि मुलीला त्त्यांच्या स्वाधिन केले. मेट्रो अधिकाऱ्यांच्या सतर्कतेमुळे एका १४ वर्षांच्या मुलीला तिच्या कुटुंबाशी पुनःमिलन करण्यात मदत केली.