scorecardresearch

Premium

वर्धा : लाजवाब! बाजरीची आंबिल, ज्वारीच्या घुगऱ्या, नाचणीची लापसी, राजगिऱ्याची कचोरी… तृणधान्याच्या खाद्यजत्रेबद्दल जाणून घ्या

प्रियदर्शिनी महिला महाविद्यालयात तृणधान्यावर आधारित पाककृती विद्यार्थींनी सादर करीत बहार उडवून दिली.

Priyadarshini Women College
वर्धा : लाजवाब! बाजरीची आंबिल, ज्वारीच्या घुगऱ्या, नाचणीची लापसी, राजगिऱ्याची कचोरी… तृणधान्याच्या खाद्यजत्रेबद्दल जाणून घ्या (image – freepik/representational image)

वर्धा : हे वर्ष आंतरराष्ट्रीय तृणधान्य वर्ष म्हणून साजरे होत आहे. मिलेट किंवा भरडधान्य म्हणूनही हे ओळखल्या जाते. नुकत्याच पार पडलेल्या जी-टेंव्टी परिषदेत या मिलेटपासून तयार झालेल्या खाद्यपदार्थांचा विविध देशांच्या ‘फर्स्ट लेडींनी’ आस्वाद घेतल्याचे वृत्त सर्वांनीच वाचले. तर इकडे तृणधान्यांचे एकापेक्षा एक पदार्थ शिजले होते. येथील प्रियदर्शिनी महिला महाविद्यालयात तृणधान्यावर आधारित पाककृती विद्यार्थींनी सादर करीत बहार उडवून दिली.

विविध १२० खाद्यपदार्थ मुलींनी तयार केले. लाह्या, हुरडा, आंबिल, खारवड्या, घुगऱ्या, ठोंबरा, धपाटे, काकवी, लापसी, दोसा, ढोकळा, पेज, उपमा, शेवया, शिरा, लाडू, कचोरी असे अनेक पारंपरिक पदार्थ नवा साज घेवून आले. प्रामुख्याने बाजरी, ज्वारी, नाचणी, राळा, भगर, कोदो, राजगीरा, जव व कांग या धान्य प्रकाराचे हे पदार्थ होते. देशातील प्रामुख्याने चौदा राज्यात हे तृणधान्य पिकविल्या जातात. पूर्वीच्या काळात हे तृण किंवा भरड धान्य हा आपल्या आहाराचा अविभाज्य भाग होता.

parent allegation on english school for not allowing students to sit in class over non payment of fees
शुल्क न भरल्याने विद्यार्थ्याला चार महिन्यांपासून वर्गात बसू दिले नाही; सोलापुरात ‘त्या’ इंग्रजी शाळेवर दुसऱ्या पालकाचा आरोप
Junior college teachers aggressive for various demands
विविध मागण्यांसाठी कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षक आक्रमक, १२ वीच्या उत्तरपत्रिका तपासणीवर बहिष्कार
case registered against three including junior engineer of mahavitaran for accepting 50 thousand bribe
५० हजारांची लाच; महावितरणच्या कनिष्ठ अभियंत्यासह तिघांवर गुन्हा
Workers of BJP Yuva Morcha vandalized Lalit Kala Kendra pune
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ; भाजप युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी ललित कला केंद्राची केली तोडफोड

हेही वाचा – गायीच्या पोटात ३३ कोटी देवतांचा वास म्हणून करतात अन्नदान; परंतु डॉक्टर म्हणतात, “यामुळे गायीचे पोट फुगून…”

सामान्य धान्यापेक्षा भरड धान्यात पोषणमूल्य साडेतीन पट अधिक असते. मधुमेही रुग्णांसाठी उत्तम असणारे हे धान्य शरीर ‘डिटॉक्स’ करण्यास मदत करते. ही खाद्यजत्रा आयोजित करणाऱ्या गृहअर्थशास्त्र विभागप्रमुख डॉ. मृणालिनी बंड यांनी लोकसत्ता ऑनलाईनला याबाबत माहिती दिली. रासायनिक खते व किटकनाशकाचा अल्प वापर होत असलेली ही धान्ये पचायला हलकी व उच्च पोषणमुल्ये असलेली आहेत. ॲलर्जीचा धोका नाही. बाजरीत फॉस्पोरस, नाचणीत कॅल्शियम, राळ्यात व भगरीत लोह, राजगिऱ्यात फायबर, ज्वारीत प्रथिने, कांगमध्ये खनिजं भरपूर प्रमाणात असतात.

हेही वाचा – बुलढाण्यातील सकल मराठा समाजाच्या महामोर्च्यात मनोज जरांगेंचे कुटुंबीय सहभागी होणार? आयोजकांचे जोरदार प्रयत्न

भगर ही लोह, खनिजे व व्हिटामिन्सने समृद्ध असून भाताऐवजी मधुमेहींनी ती खावी. रोजच्या आहारात या धान्य प्रकाराचा उपयोग झाल्यास पचन, पित्ताशयाची स्वच्छता, कोलेस्ट्रॉलचे नियंत्रण, पित्तशमन, हाडांचे आरोग्य, उर्जानिर्मिती, हिमोग्लोबिन वाढ असे व अन्य फायदे असल्याचे क्रिडातज्ञ डॉ. सोनाली शिरभाते यांनी सांगितले. मधुमेहाची राजधानी म्हटल्या जाणाऱ्या भारतातील जनतेचे आरोग्य संवर्धन करायचे असेल तर मिलेटकडे वळलेच पाहिजे, असा संदेश खाद्यजत्रेतून देण्याचा प्रयत्न झाल्याचे प्राचार्य डॉ. प्रियराज महेशकर म्हणाले.

Latest Comment
View All Comments
Post Comment

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: At priyadarshini women college in wardha students presented recipes based on cereals pmd 64 ssb

First published on: 12-09-2023 at 14:01 IST

आजचा ई-पेपर : नागपूर / विदर्भ

वाचा
epaper image

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×