scorecardresearch

Premium

फडणवीस यांच्याकडील खात्याच्या पोलिसांवर भुजबळ नाराज, म्हणाले…

अहमदनगर जिल्ह्यातील राहता परिसरातील पिंपरीनिर्मळ या गावातील दोन दलित कुटुंबांवर एका समाजातील ४००-५०० जणांनी जीवघेणा हल्ला केला. त्यावर बोट ठेवत अजित पवार गटाचे मंत्री छगन भुजबळ यांनी नाराजी व्यक्त केली.

Attack on Dalit families Pimpari Nirmal
फडणवीस यांच्याकडील खात्याच्या पोलिसांवर भुजबळ नाराज, म्हणाले… (छायाचित्र – लोकसत्ता टीम/ग्राफिक्स)

नागपूर: अहमदनगर जिल्ह्यातील राहता परिसरातील पिंपरीनिर्मळ या गावातील दोन दलित कुटुंबांवर एका समाजातील ४००-५०० जणांनी जीवघेणा हल्ला केला. त्यावर बोट ठेवत अजित पवार गटाचे मंत्री छगन भुजबळ यांनी नाराजी व्यक्त केली. विधानभवन परिसरात पत्रकारांशी बोलताना त्यांनी या प्रकरणात अ‍ॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल झाला, परंतु कुणालाही अटक नसल्याचे सांगत पोलिसांवर नाराजी व्यक्त केली.

हेही वाचा – बुलढाणा : चाळीस हजारांची लाच स्वीकारताना लिपिक जाळ्यात

sandeshkhali shahajahan shiekh
Sandeshkhali Case: लैंगिक अत्याचार प्रकरणातील फरार आरोपी आणि तृणमूल काँग्रेसच्या नेत्याला अटक नेमकी कशी झाली?
sanjay Raut amit shah
“…तर एका रात्रीत भाजपा नष्ट होईल”, आयारामांवरून संजय राऊतांचा टोला; म्हणाले, “काँग्रेसवाले आणि आमच्यासारख्यांनी…”
Cases registered against BJP workers for Slogans in support of MLA Gaikwad in Ulhasnagar
उल्हासनगरमध्ये भाजप कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल, न्यायालय परिसरात आमदार गायकवाड यांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी
MLA bacchu kadu statement
“बंदूक काढायला हरकत नाही, पण…”, बच्चू कडू यांचे भाजपा आमदाराच्या गोळीबारावर मोठं विधान

हेही वाचा – अमरावती : उत्पादन घट तरीही सोयाबीनचे दर हमीभावापेक्षा कमी, शेतकऱ्यांची चिंता वाढली

भुजबळ म्हणाले, या दोन दलित कुटुंबांच्या घराची जमावाने नासधूस केली. लहान मुलीनांही मारहाण केली. या प्रकरणी अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा ७१ जणांवर दाखल झाला. परंतु, एकाही आरोपीला अटक केलेली नाही. हे योग्य नाही. आरोपी कुणीही असो, कितीही मोठा असो आणि कुठल्याही समाजाचा, राजकीय पक्षांचा असो, त्यांना अटक झाली पाहिजे, अशी मागणी विधानभवन परिसरात प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना त्यांनी केली. निवडणुकीत गावातील नेत्यांनी सांगितलेल्या व्यक्तीला मतदान केले नाही, म्हणून हा हल्ला करण्यात आल्याचेही भुजबळ म्हणाले.

Latest Comment
View All Comments
Post Comment

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Attack on two dalit families in pimpari nirmal village of ahmednagar district chhagan bhujbal expressed his displeasure with the police mnb 82 ssb

First published on: 08-12-2023 at 13:13 IST

आजचा ई-पेपर : नागपूर / विदर्भ

वाचा
epaper image

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×